‘या’ राजाच्या शाही ‘कॉन्सर्ट’च्या फोटोमुळं वेबसाईट क्रॅश, कसले ‘ते’ – सर्वत्र खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – थायलंडच्या राजघराण्याने नवनियुक्त राजाच्या शाही कॉन्सर्टची म्हणजेच सिनीनात वॉन्गवजीरापकडी हिचे फोटो व्हायरल केले आहेत. एका वृत्त एजन्सीच्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या वेबसाईटवर भेट दिल्याने वेबसाईट क्रॅश झाली आहे. या फोटोंमध्ये मेजर जनरल सिनीनात ऍक्शनमध्ये दिसून येत आहेत. तर काही फोटोंमध्ये बंदुक चालवताना दिसून येत आहेत. तर काही फोटोंमध्ये विमान उडवताना दिसून येत आहे.

शाही राजघराण्याने राजाच्या या नोबल कॉन्सर्टची 60 फोटो आणि 40 पानांचे पुस्तक तयार केले आहे. हे फोटो आणि पुस्तक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. थायलंडचे राजा महा वजीरालॉन्गकॉर्न यांनी तिला रॉयल नोबल कॉन्सर्टची उपाधी दिली आहे. राजाने आर्मी नर्स राहिलेल्या सिनीनात हिला “Chao Khun Phra” चा शाही दर्जा दिला आहे. पहिल्यांदा थायलंडच्या कोणत्याही राजाने एका महिलेला हा शाही दर्जा दिला आहे.

दरम्यान, थायलंडचे 66 वर्षीय राजे महा वजीरालॉन्गकॉर्न यांना ‘राजा राम दहावे’ या नावाने देखील ओळखले जाते. राजाने मे महिन्यात आपली सुरक्षारक्षक सुतिदा तिदजई हिच्याशी लग्न करून सर्वांना चकित करून टाकले होते. त्यांचे हे चौथे लग्न होते.

आरोग्यविषयक वृत्त –