आया रे सबका ‘बाप’ रे… ‘ठाकरे’ , मला पण ठेका धरावा वाटत होता पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बहुचर्चित सिनेमा ‘ठाकरे’ २३ जानेवारी ला प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची प्रमुख भूमिका आहे. अतिशय वादग्रस्त संवादांमुळं चर्चेत असलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचचा सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. ‘ठाकरे’ चित्रपटातील पहिलं गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं. ‘आया रे आया सबका बापरे… कहते उसको ठाकरे’ असे या गाण्याचे बोल असून काही मिनिटांतच यूट्यूबवर या गाण्याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.

वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलात हा सोहळा पार पडला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चित्रपटाचे निर्माते खासदार संजय राऊत, चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव हे यावेळी उपस्थित होते. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर भाष्य करणारं हे गाणं असून ते नकाश अजीज यांनी गायलं आहे. संगीत रोहन यांनी दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी ‘ठाकरे’ चित्रपटातील संगीताचं यावेळी कौतुक केलं. ‘हे गाणं मलाही खूप आवडलं आहे. मला जेव्हा हे पहिल्यांदा ऐकवलं गेलं, तेव्हा मला ठेका धरावासा वाटत होता, पण मला काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं,’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us