धक्‍कादायक ! ‘या’ समाजातील अविवाहीत मुलींनी मोबाईल वापरल्यास वडिलांना १.५ लाख दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ठाकोर समाजातील अविवाहित मुलींनी मोबाईलचा वापर करायचा नाही असा फतवा या समाजाच्या पंचायतीने काढला आहे. हा भयानक प्रकार गुजरात मधील ठाकोर सामाज्याच्या पंचायतीत घडला. एवढेच नसून जर मुलींकडून मोबाईलचा वापर करण्यात आला तर त्यांना १.५ लाख रुपये दंड भरावा लागू शकतो.

ठाकोर समाजाच्या या पंचायतीने मुलींनी मोबाईल वापरणे योग्य नसल्याचे म्हणले आहे. गावातील लोक पंचायतीच्या नियमांना संविधानाचे नियम समजतात. या पंचायतीतील नियम समाजातील लोकच बनवतात. यामुळे आता ठाकोर समाजातील अविवाहित मुलीने मोबाईल बाळगणे नियमांचे उल्लंघन आहे आणि तसे केल्यास तो गुन्हा समजला जाणार आहे. ठाकोर समाज्याच्या लोकांनी रविवारी पंचायतीत हा नियम केला.

१.५ लाख रुपये दंड –

या समाजातील अविवाहित मुलीकडे मोबाईल आढळला तर तिच्या वडीलांकडून १.५ लाख रुपये दंड पंचायत वसुल करणार आहे. मुलीने कुटूंबाच्या परवानगी विना लग्न केले तर त्याला देखील ही पंचायत गुन्हा मानणार आहे. त्यामुळे या समाजातील मुलींना विवाहाआधी मोबाईल वापरण्यावर बंदी येणार आहे.

डीजे आणि फटाके वाजवण्यावर देखील बंदी –

जिल्हा पंचायत सदस्यांनी सांगितले आहे की, पंचायतीने समाज हितासाठी हे निर्णय घेतले आहेत. यात मोबाईलच्या निर्णया शिवाय इतर निर्णय देखील पंचायतीने घेतले आहेत. त्यात विवाहावेळा वाजवण्यात येणाऱ्या डीजेवर, फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मोबाईल वापरणे आणि त्यावर गुन्हा समजून दंड वसुल करणे यावर सध्या चर्चा सुरु आहे. मात्र हा निर्णय अजून लागू करण्यात आला नाही.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like