आज खातेवाटपाला ‘मुहूर्त’ ! जाणून घ्या कोणाकडे कोणता विभाग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – महाविकास आघाडी तयार करताना महिना घालविणाऱ्या तीन पक्षांनी आता खातेवाटप करण्यासाठी तब्बल १३ दिवस लावले असून आज शपथ घेतलेल्या ६ मंत्र्यांना खातेवाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे सरकारमधील महत्वाची गृह आणि नगरविकास ही महत्वाची खाती शिवसेनेकडे तर, गृहनिर्माण आणि अर्थ ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे असतील. मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर करण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरे आणि इतर ६ मंत्र्यांनी शपथ घेऊन १४ वा दिवस आहे. असे असले तरी अद्याप खातेवाटप जाहीर न झाल्याने ठाकरे सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी बैठकांवर बैठक सुरु आहेत. दुसरीकडे सहा मंत्र्यांना खातेवाटप नसल्याने काहीही काम नाही. त्यांचे मंत्रीपद हे केवळ शोभेचे झाले आहे.

हिवाळी अधिवेशन तोंडावर आले असून मंगळवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. १६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाला तोंड देण्यासाठी आज मंत्र्यांचे खातेवाटप होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ खातेवाटप असं असण्याची शक्यता !

राष्ट्रवादी

वित्त आणि नियोजन
गृहनिर्माण
कृषी
सार्वजनिक आरोग्य
सहकार
सार्वजनिक बांधकाम

शिवसेना

गृह
नगरविकास
परिवहन
उद्योग
सामाजिक न्याय
पर्यावरण
उच्च व तंत्रशिक्षण

काँग्रेस

महसूल
ऊर्जा
जलसंपदा
आदिवासी विकास
वैदकीय शिक्षण
शालेय शिक्षण
महिला व बालकल्याण

Visit : policenama.com