ठाण्यात भरदिवसा तरुणीवर चाकूने वार

ठाणे: पोलीनामा ऑनलाईन

ठाण्यामध्ये एका २० वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला. जखमी तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने ठाणे शहरात खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

प्राची विकास झाडे (वय- २०) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
[amazon_link asins=’B07DCNB9FG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’98593bfd-97c0-11e8-8aa1-29b091ffa059′]
ही घटना आज (शनिवार) सकाळी अकराच्या सुमारास हायवेलगत असलेल्या आरटीओ कार्यालयासमोर घडली. हल्लेखोराने प्राची झाडे या तरुणीवर चाकूने वार केले. त्यानंतर तो पसार झाला. या हल्ल्यात प्राची गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या हल्ल्यामागील कारण समजू शकलं नाही. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

 

You might also like