ठाण्यात अपहरणाचे प्रमाण वाढले, 6 महिन्यात तब्बल 450 गुन्हे दाखल

ठाणेः पोलीसनामा आॅनलाईन

ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत अपहरणाचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरणाचे सत्र काही केल्यानं थांबता- थांबत नसून,महिन्याकाठी सरासरी अपहरणाचे 75 गुन्हे दाखल होत आहेत. मागील सहा महिन्यांतील अपहरणाच्या गुन्ह्यांची संख्या 450 च्या आसपास आहे. तर सर्वाधिक गुन्ह्यांच्या नोंदीमध्ये मुंब्रा पोलिस ठाणे आघाडीवर आहे. या ठाण्यात अपहरणाचे 50 गुन्हे नाेंदले गेले असून, 90 टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

एखादा अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी जर बेपत्ता झाली तर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात येते. यामुळे पोलीस या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन बेपत्ता झालेल्या मुला-मुलीचा शोध घेतील. त्यामुळे अपहरण गुन्ह्याच्या नोंदीत वाढ दिसून येते. अत्यंत संवेदनशील असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागते. कारण अनेकदा खंडणी न दिल्यास अपहरण करण्यात आलेल्या मुलांचा किंवा मोठ्यांचाही जीव घेण्यास आरोपी मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे पोलिसांना विशेष खबरदारी घेत काम करावे लागते. मात्र प्रत्येक वेळी पोलिसांच्या प्रयत्नांना यश येतेच असे नाही, अनेकदा पोलीस अपहरणाचे गुन्हे उघडकीस आणण्यास फारसा रस दाखवत नाहीत. त्याचा परिणाम गुन्ह्याच्या वाढीमध्ये होतो. परिणामी गुन्ह्यांची उकल मात्र मागे राहते.
[amazon_link asins=’B071VM3GZ3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’60099c8f-9ed7-11e8-aee6-2dc5e3fa8955′]
अपहरणाच्या बाबातीत विचार करायचा झाला तर सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दील अपहरणाचे दिवसाकाठी किमान दोन गुन्हे दाखल होत आहेत. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत अपहरणाचे एकूण 450 गुन्हे असून, यापैकी 351 गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आलं आहे. हे प्रमाण 78 टक्के आहे. यावरुन महिन्याला अपहरणाचे 60 हून अधिक पुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदवले जात आहेत.
[amazon_link asins=’B0119ROQXY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d94c898-9ed7-11e8-a2e1-9b4fe81a3061′]