Thane ACB Trap | 1500 रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह एजंट अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्यासाठी 1500 रुपये लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह एजंटला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB Trap) रंगेहाथ पकडले. पोलीस शिपाई (Police Constable) रामचंद्र यशवंत बांगर Ramchandra Yashwant Bangar (वय-31) आणि एजंट श्याम चंदेश्वर पंडीत Shyam Chandeshwar Pandit (वय-32) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ठाणे एसीबीच्या पथकाने (Thane ACB Trap) ही कारवाई मंगळवारी (दि.15) केली.

 

याबाबत 22 वर्षाच्या हॉटेल व्यावसायिकाने ठाणे एसीबीकडे (Thane ACB Trap) मंगळवारी (दि.15) तक्रार केली. पोलीस शिपाई रामचंद्र बांगर हे काशीमिरा पोलीस ठाण्यात (Kashimira Police Station) कार्यरत आहेत. तक्रारदार यांनी नव्याने हॉटेल (ढाबा) सुरु केला आहे. हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्यासाठी बांगर यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपये लाचेची मागणी (Demanding Bribe) केली. तक्रादार यांनी ठाणे एसबीकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता बांगर यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 1500 रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. बांगर याच्यासाठी दीड हजार रुपये लाच घेताना एजंट श्याम पंडीत याला पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar)
यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक अश्विनी संतोष पाटील (DySP Ashwini Santosh Patil) पोलीस हवालदार महाडिक,
महिला पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक पाटील, चालक पोलीस हवालदार शिंदे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Thane ACB Trap | Anti-corruption agent caught with policeman while taking bribe of Rs.1500

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा