Thane ACB Trap | 15 हजार रुपये लाच घेताना भिवंडी महापालिकेतील लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – वारसाहक्काने सफाई कामगार या पदावर नोकरीत सामावून घेण्यासाठी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) लिपिकाला 15 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB Trap) रंगेहाथ पकडले. बाळा नारायण जाधव Bala Narayan Jadhav (वय-52) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. ठाणे एसीबीच्या पथकाने (Thane ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी महापालिकेत केली.

 

याबाबत तक्रारदाराने गुरुवारी (दि.15) ठाणे एसीबीकडे (Thane ACB Trap) तक्रार केली. तक्रारदार यांच्या वडिलांनी सफाई कामगार या पदावरुन भिवंडी निजामपूर शहर महापालिकेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. वडिलांच्या स्वेच्छा निवृत्तीनंतर (Voluntary Retirement) त्यांच्या जागेवर वारसाहक्काने नोकरीत सामावून घेण्यासाठी तक्रारदार यांनी 6 मार्च रोजी अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी बुधवारी बाळा जाधव यांची भेट घेतली. त्यावेळी बाळा जाधव याने वडिलांच्या जागेवर वारसाहक्काने नोकरीत सामावून घेण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदार यांना लाज देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे एसीबीकडे बाळा जाधव याच्या विरोधात लेखी तक्रार नोंदवली.

प्राप्त तक्रारीवरुन एसीबीच्या पथकाने शुक्रवारी पडताळणी केली. त्यावेळी बाळा जाधव
याने तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन 15 ते 20 हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले तसेच
ते स्विकारण्याचे मान्य केल्याचे केले.
उर्वरित रक्कम काम झाल्यानंतर स्विकारण्याचे बाळा जाधव याने मान्य केले.
एसीबीच्या पथकाने महापालिकेत सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपये लाच घेताना बाळा जाधव याला रंगेहाथ पकडले.
जाधव याच्यावर निजामपूर पोलीस ठाण्यात (Nizampur Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Thane ACB Trap | Clerk of Bhiwandi Municipal Corporation caught in anti-corruption net while taking Rs 15 thousand bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी चिंचवडमध्ये झळकले कुख्यात गुन्हेगार नीलेश घायवळच्या वाढदिवसाचे बॅनर्स, प्रचंड खळबळ

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून राष्ट्रपतींना दौंड आणि इंदापूर भेटीचे निमंत्रण

Mohan Joshi Pune | ‘पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका पुढे ढकलल्या’ – मोहन जोशी