Homeअ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)Thane ACB Trap | 5 हजार रुपये लाच घेताना ठाणे मालमत्ता कर...

Thane ACB Trap | 5 हजार रुपये लाच घेताना ठाणे मालमत्ता कर विभागातील लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – खरेदी केलेल्या प्लॉटचे मालमत्ता कर (Property Tax) नावावर करण्यासाठी वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालयातील (Vartak Nagar Ward Committee Office) लिपिकाला (Clerk) पाच हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB Trap) रंगेहात पकडले. प्रवीण गजेंद्रनाथ सरपाते Praveen Gajendranath Sarpate (वय-46) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या मालमत्ता कर विभागातील लिपिकाचे नाव आहे. ही कारवाई (Thane ACB Trap) गुरुवारी (दि.22) वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालयात करण्यात आली.

 

याबाबत तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Thane ACB Trap) तक्रार केली आह. तक्रारदार यांनी लोकमान्यनगर पाडा नं.1 येथे प्लॉट खरेदी केला आहे. या प्लॉटचा मालमत्ता कर नावावर करुन मिळण्यासाठी 22 जुलै रोजी तक्रारदार यांनी वेदांत प्रभाग समिती वर्तकनगर येथे अर्ज दाखल केला होता. तक्रारदार यांनी खरेदी केलेली मालमत्ता हस्तांतरीत करण्यात मदत करण्यासाठी प्रवीण सरतापे याने 5 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत ठाणे एसीबीकडे तक्रार केली.

 

ठाणे एसीबीच्या पथकाने बुधवारी (दि.21) पडताळणी केली असता,
सरतापे यांनी तक्रारदार यांच्या नावावर मालमत्ता कर नावावर करुन देण्यासाठी 5 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार गुरुवारी प्रभाग समिती कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाच स्विकारताना सरतापे यांना रंगेहात पकडण्यात आले.
प्रवीण सरतापे यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात (Vartaknagar Police Station)
भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले (SP Punjabrao Ugale),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पथकाने केली.

 

Web Title :- Thane ACB Trap | Clerk of Thane property tax department arrested by anti-corruption while accepting bribe of Rs.5 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | खासदार भावना गवळींचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, कालपर्यंत मी त्यांची ताई होते, आज लगेच बाई झाले

Buldhana Poisoning Case | भगर पीठ खाल्याने 20 जणांना विषबाधा, बुलढाणा मधील घटना

Satara ACB Trap | 2 हजार रुपये लाच घेताना तहसील कार्यालयातील कारकुन आणि खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News