Thane ACB Trap | दोन लाखांची लाच घेताना महाविद्यालयाचा प्राचार्य, प्राध्यापक, शिपाई अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्तव्यावर हजर करून मागील शिल्लक वेतन देण्यासाठी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून दोन लाख रुपये लाच घेताना वज्रेश्वरी येथील अंबिकाबाई जाधव महिला महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिपायाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. ठाणे एसीबीच्या पथकाने (Thane ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.5) दुपारी दीडच्या सुमारास केली. या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अंबिकाबाई जाधव महिला महाविद्यालयचे प्राचार्य महादेव बुवाजी कांबळे, प्राध्यापक सुग्रीव बाबूराव आंधळे (वय 52), शिपाई वसंत भाऊ हरड (वय 57) अशी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 58 वर्षीय महिलेने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Thane ACB Trap) शुक्रवारी (दि. 3) तक्रार केली.
यातील तक्रारदार यांना रुग्ण निवेदनातून कर्तव्यावर हजर करून घेऊन मागील शिल्लक वेतन देण्याकरिता अंबिकाबाई जाधव महिला महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव कांबळे, प्राध्यापक सुग्रीव आंधळे यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी ठाणे एसीबीकडे याबाबत तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता, कांबळे व आंधळे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम शिपाई वसंत हरड याच्याकडे देण्यास सांगितले. पथकाने सोमवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये लाच घेताना वसंत हरड यांना रंगेहात पकडले. यानंतर प्राचार्य महादेव कांबळे आणि प्राध्यापक सुग्रीव आंधळे यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अश्विनी संतोष पाटील, पोलीस अंमलदार महाडिक,
मोरे, पाटील, महिला पोलीस अंमलदार शिंदे, चालक शिंदे यांच्या पथकाने केली.
Web Title :- Thane ACB Trap | College principal, professor, constable in anti-corruption net while taking bribe of two lakhs
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nana Patole | भाजपने शिवाजी महाराजांची बदनामी करणे हे जाणीपूर्वक रचलेले षडयंत्र – नाना पटोले