Thane ACB Trap | 6 हजार रुपये लाच घेताना वन परिमंडळ अधिकारी अँन्टी करप्शनच्या ताब्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – मरुम मातीची गाडी येऊर टेकडीवर जाऊ देण्यासाठी दहा गाड्यांचे प्रत्येकी 600 रुपये प्रमाणे सहा हजार रुपये लाच (Accepting Bribe) घेताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi National Park) वनक्षेत्राचे वन परिमंडळ अधिकारी (Forest Circle Officer) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB Trap) सापळा रचून ताब्यात घेतले. विकास शांताराम कदम Vikas Shantaram Kadam (वय-50) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ठाणे एसीबीच्या (Thane ACB Trap) पथकाने ही कारवाई उपवन तलावाच्या मेनगेटजवळ केली. (Thane Crime News)

 

याबाबत तक्रारदार यांनी ठाणे एसीबीकडे (Thane ACB Trap) 25 जानेवारी रोजी लेखी तक्रार केली होती. तक्रारदार यांच्याकडील मुरुम मातीची गाडी येऊर टेकडीवर जाऊन देण्यासाठी वन परिमंडळ अधिकारी विकास कदम यांनी प्रत्येक गाडीचे सहाशे रुपये याप्रमाणे 10 गाड्यांचे सहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत ठाणे एसीबीकडे तक्रार केली.

 

पथकाने सोमवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता, विकास कदम यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार उपवन तलावाजवळ (Upvan Lake) सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून सहा हजार रुपये लाच घेताना विकास कदम यांना रंगेहात पकडण्यात आले. कदम यांच्यावर वर्तकनगर पोलीस ठाण्यात (Vartaknagar Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पथकाने केली.

 

Web Title :- Thane ACB Trap | Forest circle officer in custody of anti-corruption while accepting bribe of 6 thousand rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bachchu Kadu | ‘शिंदे गटाच्या उठावामुळे राज्यात राजकीय अस्थिरता;’ आमदार बच्चू कडूंचा शिंदे गटाला घरचा आहेर

Pune Crime News | जेवण न देता दारु पिलेल्या दुसर्‍या पत्नीचा लाथाबुक्क्यांनी केला खून; रिक्षाचालकाला अटक

Mumbai Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू