Thane ACB Trap | मासिक हप्ता 20 हजार रुपये घेताना पोलीस नाईक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Thane ACB Trap | गाडीवर कारवाई न करण्यासाठी मासिक हप्त्याची (Monthly Installment) मागणी करुन 20 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पडघा पोलीस ठाण्यातील (Padgha Police Station) पोलीस नाईक भरत शरद जगदाळे Police Naik Bharat Sharad Jagdale (वय-40) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ठाणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि.22) तळवली पोलीस चौकी (Talwali Police Chowki) समोर करण्यात आली.

याबाबत वाहन चालकाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Thane ACB Trap) तक्रार केली. तक्रारदार हे वाहन चालक असून ते नाशिक, कसारा, मालेगांव, ठाणे, पुणे असे मिळेल ते भाडे घेऊन व्यवसाय करतात. पोलीस नाईक भरत जगदाळे यांनी तक्रारदार यांच्या वाहनावर कारवाई (Action on vehicle) न करण्यासाठी आणि वाहतूक व्यवसाय (Transport Business) सुरळीत सुरु ठेवण्यासाठी मासिक हप्ता 30 हजार रुपये मागितला. तडजोडी अंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, वाहन चालकाने ठाणे एसीबीकडे तक्रार केली.

ठाणे एसीबीच्या पथकाने बुधवारी (दि.21) आणि गुरुवारी (दि.22) पडताळणी केली असता, जगदाळे यांनी पंचासमक्ष 30 हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती 20 हजार रुपये स्विकारण्याचे कबुल केले. आज तळवली पोलीस चौकी समोर पथकाने सापळा रचून पोलीस नाईक भरत जगदाळे यांना तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. जगदाळे यांच्याविरुद्ध पडघा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले (SP Punjabrao Ugale),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक संतोष अंबिके (Police Inspector Santosh Ambike), पोलीस नाईक विनायक जगताप,
पोलीस नाईक नवनीत सानप, महिला पोलीस नाईक जाधव यांच्या पथकाने केली.

Web Title :- Thane ACB Trap | Police Naik In ACB Net In Bribe Case Thane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर; म्हणाले – ‘हिंमत होती तर…’ (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंची टीका फडणवीसांच्या जिव्हारी, म्हणाले – अडीच वर्षांत तिघे मिळून मला संपवू शकला नाहीत, यापुढे…