Thane : व्हिडीओ क्लीपमध्ये पत्नी प्रियकरासोबत नग्नावस्थेत दिसली, नवर्‍यानं रागाच्या भरात बायकोवर चाकूने सपासप वार करून संपवलं

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीची तिच्या प्रियकरासोबत नग्नावस्थेतील मोबाईलवर व्हिडिओ क्लिप पाहताच पतीने पत्नीची चाकूने सपासप वार करुन निर्घृण हत्या केली. भिवंडीतील नागांव रोडवरील एका चाळीत ही घटना घडली. पत्नीची हत्या करून पती स्वतःच पोलीस ठाण्यात धरदार रक्ताने माखलेल्या चाकूसह (after-killing-his-wife-husband-appeared-before-police) हजर झाला. धक्कादायक बाब म्हणजे पतीने पत्नीची हत्या केल्याची भिवंडी शहरातील गेल्या 10 महिन्यातील ही पाचवी घटना आहे.

मोहंमद रफिक मोहंमद युनूस खान (वय, 50 वर्षे), असे अटक केलेल्याचे पतीचे नाव आहे. नसरीन (वय 38 वर्षे), असे निर्घृण हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी मृत नसरीनची बहीण आएशा सैयद (23 वर्षे) हिने शांतीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, भिवंडी शहरातील अंसारनगर परिसरातील एका चाळीत आरोपी रफिक हा मृत पत्नी नसरीन आणि तीन मुलांसह 16 ते 17 वर्षांपासून राहत होता. आरोपी पती हा टाळेबंदीच्या काळात बेरोजगार झाला होता. त्यामुळे आर्थिक अडचणीतून जात असताना तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून या पती-पत्नीमध्ये रोज भांडणे होत होती. त्यामुळे ती पतीला सोडून भिवंडीतील नागांव रोडवरील गैबी नगर परिसरात राहत असलेल्या तिच्या बहिणीच्या घरी राहण्यास गेली होती. या दरम्यान मृत पत्नीचा प्रियकर सद्दाम याने नसरीन सोबत नग्नास्थेतील एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली होती. व्हिडिओ क्लिप पाहून आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नी राहत असलेल्या तिच्या बहिणीच्या घरी मंगळवारी (दि. 3 नोव्हेंबर) रात्री जाऊन तिची धारदार चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. दुसरीकडे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीला इंदिरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तपास पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर करीत आहेत.