Thane Anti Corruption | वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली 5 हजाराची लाच, पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह प्लंबर अँटी करप्शनच्या जाळ्यात

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन –  Thane Anti Corruption | कारवाई टाळण्यासाठी लाखो रुपयाची लाच मागितल्याच्या आरोपाखाली केडीएमसीच्या (KDMC) दोन अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. अधिकाऱ्यांना नोटीस बजवाल्याच्या घटनेला 24 तास होत नाही तोच वर्क ऑर्डर (Work order) काढण्यासाठी (Bribe) मागणाऱ्या मनपा पाणीपुरवठा विभागातील (water supply department) कनिष्ठ अभियंता आणि खासगी प्लंबरला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane Anti Corruption Bureau) सापळा रचून (Anti Corruption Trap) अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई मंगळवारी (दि.7) डोंबिवली विभागीय कार्यालयात केली. एकिकडे विकासकामांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम सुरु असताना लाचेची ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

केडीएमसीमधील पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज (Junior Engineer Sunil Valanj) आणि खासगी प्लंबर रविंद्र डायरे (Private plumber Ravindra Dyare)
असे लाच घेताना (Accepting Bribe) पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार दिली आहे.

तक्रारदार हे प्लंबिंगची कामे करतात. एका व्यक्तीने त्यांचेकडे नवीन घराकरीता पिण्याच्या
पाण्याचे नवीन नळजोडणी महापालिकेकडून मंजूर करुन देण्याचे काम दिले होते.
त्याप्रमाणे केडीएमसीचे फ आणि ग प्रभागातील पाणी पुरवठा विभागाचे
कनिष्ठ अभियंता वाळंज यांनी तक्रारदार यांचेकडे पाच हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली.
तडजोडीमध्ये 4 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

 

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे एसीबीकडे (ACB) तक्रार केली.
तक्रारीची पंचासमक्ष चौकशी केली असता वाळंज याने लाच स्विकारण्याचे मान्य करुन
खासगी प्लंबर डायरे यांच्याकडे देण्यास सांगितले.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विलास मते (police inspector Vilas Mate) यांच्या पथकाने सापळा रचून डायरे याला लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले.

 

 

Web Title : Thane Anti Corruption | demand bribes remove work orders private plumberarrested junior engineer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या पेन्शन नियमामध्ये मोठा बदल, जाणून घ्या किती मिळतील पैसे

EPF Withdrawal Claim | ‘या’ 5 कारणांमुळे रद्द होऊ शकतो तुमचा ‘ईपीएफ विड्रॉल क्लेम’; जाणून घ्या

Cholesterol Control Drink | कोलेस्ट्रॉल कमी करणारे ‘हे’ 8 लाभदायक ड्रिंक्स, हार्ट अटॅकचा धोका करतील कमी; जाणून घ्या