Thane Anti Corruption | 4 लाखाची लाच घेऊन पुन्हा 1 लाखाची मागणी, सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Thane Anti Corruption | मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या (Mumbai-Vadodara Expressway) भुसंपादनामध्ये जाणाऱ्या जमिनीचे मूल्यमापन करुन अहवाल (valuation report) देण्यासाठी सुरुवातीला 4 लाख रुपयाची लाच घेतली. त्यानंतर पुन्हा 1 लाखाच्या लाचेची मागणी करुन लाच घेताना (Accepting Bribe) कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून (Thane Anti Corruption) रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई सोमवारी (दि.13) दुपारी एकच्या सुमारास बांधकाम विभागाच्या कार्यालयात केली. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अविनाश पांडुरंग भानुशाली Avinash Pandurang Bhanushali (वय-57) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या शाखा अभियंत्याचे (Branch Engineer) नाव आहे.
याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Thane Anti Corruption Bureau) तक्रार केली.
अविनाश भानुशाली याने तक्रारदार यांच्याकडे 9 सप्टेंबर रोजी एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार यांच्या अशिलाच्या मालकीच्या जमीनीवरील बांधकाम हे मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या भुसंपादनात (land acquisition) जात आहे.
या जमीनीवरील बांधकामाचे मुल्यमापन करुन अहवाल देण्यासाठी अविनाश भानुशाली याने एक लाखाची लाच मागितली.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 9 सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणीमध्ये अविनाश याने 4 लाख रुपये लाच घेतल्याची कबुली दिली होती.

 

चार लाख रुपये घेतल्यानंतर देखील अविनाश भानुशाली याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाखाची मागणी केली. तसेच एक लाख रुपये दिल्याशिवाय अहवाल मिळणार नसल्याचे सांगितले.
तक्रारदार यांनी एसीबी (ACB) कडे तक्रार केल्यानंतर आज कल्याण येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून 1 लाखाची लाचेची रक्कम स्वीकारताना भानुशाली याला रंगेहाथ पकडण्यात आले.

 

Web Title : Thane Anti Corruption | Demand for Rs 1 lakh again after taking bribe of Rs 4 lakh, Branch Engineer in Public Works Department caught in anti-corruption net

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ZP Election | ओबीसी आरक्षणाशिवाय होणार ZP पोटनिवडणुका; राजकीय वातावरण तापणार

LIC Jeevan Labh Policy | ‘एलआयसी’ची जीवन लाभ पॉलिसी देईल मोठा फायदा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळतात ‘लाभ’

Murder In Jalgaon | चॉपरने सपासप वार करुन मुलानं बापालं संपवलं