Thane Anti Courruption | 2 कोटीचे लाच प्रकरण ! 50 लाखाची लाच घेताना राज्यातील ‘सत्ताधारी’ पक्षाच्या नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं; ACB ची मोठी कारवाई, राज्यात प्रचंड खळबळ

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – Thane Anti Courruption | लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सत्ताधारी पक्षाच्या स्विकृत नगरसेवकास 2 कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात 50 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली (Thane Anti Courruption) आहे.

या प्रकरणी 57 वर्षाच्या व्यक्तीने (Thane Anti Courruption) तक्रार दिली आहे. सिद्धेश्वर मोगलअप्पा कामुर्ती corporator from Bhiwandi Siddheswar Kamurti (62वर्षे, स्वीकृत नगरसेवक, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका) असे त्याचे नाव आहे. त्याने 2 कोटी रुपये मागितले होते. तडजोड अंती 50 लाख देण्याचे ठरले. ही मागणी दि. 4/10/2021 रोजी झाली. पण सापळा आज रचण्यात आला आणि तो यशस्वी झाला आहे.

तक्रारदार यांचे पद्मानगर भाजी मार्केट भिवंडी येथे दुकान असून, तेथे सुमारे 100 दुकाने आहेत. सदर दुकाने अनाधिकृत असून, ती तोडण्याबाबत लोकसेवक कामुर्ती (corporator from Bhiwandi Siddheswar Kamurti) यांनी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका येथे अर्ज केला होता. सदर अर्ज मागे घेण्यात करिता तक्रारदार यांचेकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. (Thane Anti Courruption) तक्रारदार यांना आरोपी लोकसेवक यांना 2 कोटी रुपये देण्याची अजिबात इच्छा नसल्याने, तक्रारदार यांनी दि. 30/09/2021 रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग (ठाणे) येथे येवुन लेखी तक्रार दिली होती.

 

सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि. 4/10/2021 रोजी केलेल्या पडताळणी मध्ये आरोपीत लोकसेवक यांनी तडजोडअंती 50 लाख रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला आज (दि. 13/10/2021) रोजी आरोपी लोकसेवक यांचे विरुद्ध सापळा कारवाई करून त्यास तक्रारदार यांच्याकडून 50 लाख लाच घेताना पकडण्यात आले. (Thane Anti Courruption) Thane ACB SP पंजाबराव उगले, Addl SP अनिल घेरडीकर यांच्या मारदर्शनाखाली DySp माया मोरे (DySp Maya More), मनोज प्रजापती ( पोलीस निरीक्षक, ACB Thane), पो.हवा. तारी, पो.ना. भवारी, पो.ना. तडवी, म.पो.ना.ठोंबरे यांनी ही कारवाई केली आहे.

 

Web Title :- Thane Anti Corruption | Thane Anti Corruption arrest bhiwandi corporator siddheshwar kamurti in 50 lakh bribe case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon Anti Corruption | 20 हजाराची लाच घेताना महिला दक्षता विभागातील पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Medical Abortion | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ महिलांना 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीविरोधात पुणे पोलिसांची ‘लुकआऊट नोटीस’