भिंवडीमध्ये 3 मजली इमारत कोसळल्याने 8 नागरिक ठार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भिंवडीमध्ये आज पहाटे तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. या भयंकर घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. पहाटे सगळे  झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठाण्यातील भिंवडीमध्ये एक तीन मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे भूईसपाट झाली. भिंवडीतील पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंट ही दुर्घटना घडली आहे. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. त्यानंतर सर्वत्र आरडाओरड आणि धावपळ सुरू झाली. इमारत दुर्घटनेनंतर तातडीने ठाणे महानगर पालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर मदत कार्य वेगाने सुरू करण्यात आले. त्याशिवाय परिसरातील सर्तक नागरिकांमुळे 20 जणांना इमारतीच्या ढिगार्‍याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सकाळी साडेसातपर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिली. दरम्यान, यामध्ये आणखी मृत्यूसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like