अभिनेत्री प्राजक्ता माळीला ठाणे कोर्टाकडून दुसरं ‘समन्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ड्रेस डिझायनरला केलेल्या मारहाणप्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळीला कोर्टात हजर राहण्यासाठी दुसरं समन्स जारी करण्यात आला आहे. ठाणे दंडाधिकारी कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. बुधवारी झालेल्या सुनवणीत प्राजक्ता माळी पुन्हा एकदा गैरहजर असल्यानं हा समन्स बजावण्यात आला आहे. प्राजक्ताची ड्रेस डिझायनर जान्हवी मनचंदानं ठाणे कोर्टात याचिका दाखल केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

5 एप्रिल 2019 रोजी मिरा रोडवरील मोनार्क स्टुडिओत एका रिअ‍ॅलिटी शो दरम्यान प्राजक्ता माळी आणि ड्रेस डिझायनर जान्हवी मनचंदा यांच्यात वाद झाला होता. यावेळी व्हॅनिटी व्हॅन मध्ये बोलावून प्राजक्ता माळीने आपल्याला मारहाण केली असा आरोप जान्हवीने केला होता. जान्हवीने प्राजक्ता माळी विरोधात काशिमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु याबाबत बोलताना प्राजक्ता म्हणते की, जान्हवीने स्वत:च इजा करून आपल्यावर खोटे आरोप केले आहेत.

नेमकं काय घडलं ?

प्राजक्ताला डिझायनर जान्हवी मनचंदा हिने दिलेले कपडे योग्य नव्हते या क्षुल्लक कारणावरून तिने मारहाण केली आहे असा आरोप जान्हवीने केला आहे. मुख्य म्हणजे प्राजक्ता आणि जान्हवी यांच्यात याबाबत झालेल्या संभाषणाचा व्हॉट्सअ‍ॅप स्क्रिनशॉटही काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

दरम्यान, प्राजक्ता माळीने याबाबत बोलताना मात्र तिच्यावरील आरोप हे खोटे आहेत असे सांगत सर्व आरोप फोटाळून लावले होते. याबाबत बोलताना प्राजक्त माळी म्हणते की, “माझे आणि जान्हवीचे कपड्यांवरून वाद झाले होते हे खरे आहे. पंरतु तिला मी कोणत्याही प्रकारची मारहाण केलेली नाही. तिने केलेल सर्व आरोप हे खोटे आहेत.” असे प्राजक्ता म्हणाली होती.

लाल फळे आरोग्याला फायदेशीर, नियमित करा सेवन

ताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव

माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास विश्वास नांगरे पाटील आणि CM देवेंद्र फडणवीस जबाबदार – गुणरत्न सदावर्तें यांचा गौप्यस्फोट

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like