Thane Crime | औरंगाबादमधील पोलिस कर्मचार्‍याचा मृतदेह ठाण्यातील फुटपाथवर आढळल्याने प्रचंड खळबळ

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Thane Crime । ठाण्यातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. औरंगाबादमधील (Aurangabad) एका पोलीस कर्मचाऱ्याचा ठाण्यात मृतदेह (dead) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चक्क ठाण्याच्या फूटपाथवर बुधवारी (28 जुलै) रोजी पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह (Police Constable dead) आढळून आल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ (Thane Crime) उडाली आहे. बळीराम मोरे (वय, 40, औरंगाबाद) असे मृत हवालदाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस कर्मचारी बळीराम मोरे (Police Constable Baliram More) हे ठाण्यातील बाजारपेठ परिसरातील एका फूटपाथवर आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. बळीराम मोरे हे औरंगाबाद येथील पोलिसांच्या मोटर परिवहन विभागात कार्यरत होते. या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांशी (Aurangabad Police) संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आहे की, बळीराम मोरे यांची प्रकृती ठिक नसल्याने ते रजेवर होते. असं सांगण्यात आलं आहे.

या दरम्यान, ठाणे पोलिसांच्या (Thane Police) बिट मार्शल टीममधील पोलीस नाईक महाले
आणि थविल यांना मृत पोलीस कर्मचारी बळीराम मोरे हे फूटपाथवर आढळून आले होते.
दरम्यान बळीराम मोरे हे रजेवर असल्याने ते ठाण्यात कसे आले आणि फूटपाथवर त्यांचा मृतदेह कसा आढळून आला हे सर्व प्रश्न अजून अस्पष्ट आहेत.
तर, या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Thane Crime | aurangabad police constable baliram more found dead in thane on footpath

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tokyo Olympics | शेवटच्या तीन मिनिटात केली कमाल, गत विजेत्या अर्जेटिनावर भारताची 3-1 अशी मात; उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

Nashik Crime | नाशिकच्या ‘सोनाली मटण-भाकरी’ हॉटेलमध्ये 25 वर्षीय तरुणाचा खून

Maharashtra Rains | राज्यात पावसामुळे आठवडयात 213 जणांचा मृत्यू तर 61280 पाळीव जनावरे मृत्युमुखी; 435879 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले