Thane Crime | ठाण्यातील पोलीस भरतीत गैरप्रकार ! 5 परीक्षार्थीविरुद्ध गुन्हा दाखल; पुण्यातील एकाचा समावेश

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Thane Crime | ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर चालक पदासाठी रविवारी लेखी परीक्षा पार पडली. यावेळी एका केंद्रावर पाच परीक्षार्थीनी नियम व अटींचे उल्लंघन केल्याचे समोर आले. याप्रकरणी या पाच जणांवर कलम ४१९ प्रमाणे कापूरबावडी पोलीस ठाण्यात (kapurbawdi police station) गुन्हा दाखल (Thane Crime) केला आहे.

देवेंद्र बोरसे (२८, रा. कावठे, साक्री, जि. धुळे), बापू गावडे (४०, रा. बारामती, जि. पुणे), प्रफुल्ल मंडाले (२५, रा. सिंहगड रोड, जि. पुणे), मनोज पिंपरे (२४, रा. देऊळवाडी, ता. उदगीर, जि. लातूर) आणि अनिकेत पाटील (२५, रा. भडगाव, जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या परीक्षार्थीची नावे आहेत.

ठाणे शहर आणि वागळे इस्टेट (wagle estate) या दोन परिमंडळातील ४९ केंद्रावरील शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये रविवारी चालक पदासाठी लेखी परीक्षा झाली. ११ हजार ३८ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. दरम्यान, बाळकुम येथील विद्या प्रसारक विद्यालयाच्या केंद्र क्रमांक २१ मधील कक्ष क्रमांक पाचमध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गैरप्रकार आढळून आला. या कक्षातील देवेंद्र बोरसे, बापू गावडे, प्रफुल्ल मंडाले, मनोज पिंपरे, अनिकेत पाटील यांनी परीक्षेचे नियम, अटी माहिती असतांनाही त्याचे उल्लंघन केले. त्यांनी एकमेकांना फायदा होण्यासाठी आपसात संगनमत करुन प्रश्नपत्रिकेवर उत्तरांच्या खुणा करुन ही प्रश्नपत्रिका आपआपसात आदलाबदल केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणारे निजामपुरा पोलीस ठाण्याचे (nizampura police station) पोलीस निरीक्षक अतुल लंबे (Police Inspector Atul Lambe) यांनी शासनातर्फे कापूरबावडी पोलीस ठाण्यात या पाचही जणांविरुद्ध रविवारी रात्री गुन्हा दाखल केला. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. मोसमकर (API V.V. Mosamkar) करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune-Mumbai Expressway | ट्रेलरमधील कागदाचे मोठे रिळ कारवर पडले, एकाचा मृत्यू; घाटात वाहतूककोंडी

Petrol Diesel Price Today | सर्वसामान्यांना महागाईचा फटका ! लागोपाठ दुसर्‍या दिवशी वाढले डिझेलचे दर, जाणून घ्या नवीन दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Thane Crime | case has been registered against five candidates misconduct police recruitment thane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update