Thane Crime | अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींना अखेर मुरबाड पोलीसांकडून अटक

ठाणे / मुरबाड : पोलिसनामा ऑनलाइन – Thane Crime | एका कपड्याच्या दुकानात व्हिडीओ बनवुन तो टिकटाॅकवर टाकला म्हणून नारिवली येथील दोन तरुणांना व त्यांना वाचवण्यासाठी गेलेला दयानंद भोईर (Dayanand Bhoir) असे तिघांना देवगांव मुरबाड येथील मुरबाड बसस्थानकात बोलावून अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना (Thane Crime) घडली आहे. हा प्रकार अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस चौकी समोर घडला. माञ मारहाण करणा-यांच्या दहशतीमुळे त्या तरुणांनी पोलिस ठाण्यात जाण्याचे टाळले. या गंभीर घटनेची कोणत्याही सामाजिक संघटनेने दखल न घेतल्याने अखेर काही नागरिकांच्या पुढाकाराने मुरबाड पोलिस ठाण्यात (Murbad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. व आरोपींना अटक (Arrested) करण्यात आली.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरबाड येथील नमस्कार मॅरेज हाॅल येथे कपड्यांचा सेल लावण्यात आला होता.
या ठिकाणी 2 महिला कपड्यांची पाहणी करीत होत्या.
तर नारिवली येथील ते दोन तरुण त्या महिलांना कपडे दाखवत असल्याचा व्हिडीओ बनवुन तो टिकटॉक वर शेअर केला.
या व्हिडीओत एका चिञपटातील डायलाॅग बोलला जात असल्याचे दाखवले आहे.
परंतू मुरबाड शेजारील देवगांव येथील कचरु टेकडे (Kacharu Tekade), विठ्ठल टेकडे (Vitthal Tekade) व विशाल टेकडे (Vishal Tekade) यांना हा व्हिडोओ आक्षेपार्ह असल्याचे समजून त्यांनी नारिवली येथील या तरुणांना मुरबाड बस स्थानकात गाठून बेदम मारहाण केली. त्यांना उठाबशा काढायला लावल्या.
व त्याचा व्हिडीओ तयार करुन तो सर्वञ व्हायरल केला.
यामुळे ते तरुण भयभित झाले होते.
त्यामुळे 2 दिवस होऊन देखील ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास जात नव्हते. (Thane Crime)

परंतु नारिवली येथील या तरुणांना आधार देऊन अखेर त्यांना मुरबाड पोलिस ठाण्यात (Murbad Police Station) नेऊन तक्रार देण्यात आली.
ही घटना तीन हात नाका पोलिस चौकी समोर घडली होती व मारहाणीचा व्हिडीओ सर्वञ व्हायरल होऊन देखील मुरबाड पोलिस अथवा कोणत्याही सामाजिक संघटनेने याची दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे या घटनेची दखल मुरबाड पोलीसांनी घेण्यास उशीर लावल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

 

मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रसाद पाढरडे (Police Inspector Prasad Padharde) यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना बेड्या ठोकल्या असून आरोपीं वर कठोर कारवाई करणार असून या पुढे कोणीही कायदा हातात घेऊ नये सार्वजनिक ठिकाणी गदारोळ,अमानुष मारहाण करू नये एवढेच नसून स्थानिक नागरिकांकडून धंद्यावाल्यांकडून हप्ते वसुली करणे, त्यांना दमदाटी करण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास त्यांची गय केली जाणार नाही.
नागरिकांनी कोणत्याही धमक्यांना बळी न जाता आपली रीतसर तक्रार मुरबाड पोलीस स्टेशन येथे दाखल केल्यास त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करणार असल्याचे पत्रकारांसमोर सांगितले.

 

दरम्यान, कचरु टेकडे, विठ्ठल टेकडे व विशाल टेकडे या आरोपीवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात येऊन त्यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. तर या आरोपीवर कलम 367 ब नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे आण्णा साळवे, दिनेश उघडे व कैलास देसले यांनी मुरबाड पोलीसांना केली.
तर त्यांनी दिलेली तक्रार पोलीसांनी घेण्यास नकार दिला असल्याचे आण्णा साळवे (Anna Salve) यांनी सांगीतले.
तर, पुढील तपास मुरबाड पोलिस करत आहेत.

 

Web Title :- Thane Crime | Murbad police finally handcuffed the accused

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा