Thane Crime News | कळवा-विटावा परिसरात खोलीतील स्लॅबचे प्लास्टर पडून दोन चिमुकले जखमी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – Thane Crime News | ठाण्यातील विटावा-कळवा परिसरात श्री साईनिवास या चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये स्लॅबचे प्लास्टर पडून 2 लहान मुले जखमी झाली आहेत. हि घटना शनिवारी सकाळी घडली आहे. या घटनेमधील चिमुकल्यांना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Thane Crime News)

काय घडले नेमके?
ठाण्यातील कळवा विटावा या परिसरात असलेल्या साईनिवास या चारमजली इमारतीमध्ये 45 कुटुंब वास्तव्याला आहेत. शनिवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील 104 क्रमांकाच्या खोलीमधील स्लॅबचे प्लास्टर अचानक कोसळले. या घटनेत चार वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी हे दोघे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी तातडीने या 2 चिमुकल्यांना कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या दुर्घटनेनंतर ही इमारत 15 वर्षे जुनी असून अनधिकृत असल्याचे समोर आले. इमारतीच्या कॉलमलाही तडे गेल्याने बांधकाम आणि अतिक्रमणविरोधी विभागाकडून ही खोली रिकामी करून सील करण्यात आली आहे.

Web Title :- Thane Crime News | 2 children injured due to slab plaster falling in room in kalwa vitawa area