Thane Crime | उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या महिलेच्या करामतीने पोलिसही चक्रावले; समोर आले तिनं केलेले ‘प्रताप’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Thane Crime | घोडबंदर रोडवरील विजय सेल्स दुकानात दिवाळीनिमित्त झालेल्या गर्दीचा फायदा घेत लॅपटॉप चोरी करणाऱ्या महिलेला कापुरबावडी (Kapurbawdi Police Station) पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे हि महिला उच्चभ्रू वस्तीत राहत असून तिने अशाच प्रकारे काही ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. या महिलेच्या करामतीमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. संबंधित महिलेकडून चोरीचा २ लाख ६५ हजारांचा माल पोलिसांनी हस्तगत केला (Thane Crime) आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय सेल्स या दुकानात दिवाळीनिमित्त ३ नोव्हेंबरला इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर विविध ऑफर्स जाहीर केल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. रात्री साडेआठच्या सुमारास गर्दीचा फायदा घेवून या महिलेनं ९९ हजार ९९९ रुपयांच्या acer कंपनीचा लॅपटॉपवर हात साफ केला. त्यानंतर विजय सेल्सने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा (Thane Crime) दाखल करण्यात आला. तपासात पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यावेळी चोरी करणारी महिला ही परिधान केलेल्या कपड्यांवरून तसंच तिच्या बोलण्यावरून सुशिक्षित आणि उच्चभ्रू वस्तीत राहणारी असावी असा संशय होता. पण तिची माहिती मिळवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होत. पोलिसांनी मोबाईल कंपनीशी संपर्क साधून प्राप्त मोबाईल क्रमांकाचं तांत्रिक विश्लेषण करून चोरी करणाऱ्या महिलेचा मोबाईल क्रमांक शोधला. या संशयित मोबाईल क्रमांकाच्या कंपनीशी संपर्क साधून त्याबाबतची सर्व माहिती प्राप्त केली. त्यानंतर घटनास्थळाहून चोरी करणाऱ्या महिलेचं प्राप्त सीसीटीव्ही फुटेज, तसंच गुन्ह्याच्या अनुषंगाने इतर ११ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासले. अखेर सापळा रचून या महिलेला ताब्यात (Thane Crime) घेण्यात आलं.

 

 

प्राथमिक तपासात महिलेने दिलेल्या कबुलीनुसार लॅपटॉप चोरला आणि
कॅश काउंटरला जाते असं सांगून लॅपटॉपचा लॉक खोलून तो एका फ्रिजमध्ये ठेवला.
नंतर लॅपटॉप बॅगेत घालून पळ काढल्याचे तिने सांगितले.
याच पद्धतीने १० ते १२ दुकानांमध्ये चोरी केल्याची तिने कबुली दिली.
पोलिसांनी विजय सेल्स मधून चोरलेला लॅपटॉप, तसंच मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क,
कॅमेरा, ब्ल्यु टुथ डिव्हाईस, कपडे, राउटर, हेडफोन्स, घडयाळ, पोर्टेबल प्रिंटर, डिव्हीडी प्लेअर,
व्हॅक्युम क्लिनर असा एकूण २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणाचा अधिक तपास (Thane Crime) सुरु आहे.

 

Web Title :- Thane Crime | woman arrested for stealing laptop in showroom at thane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा