×
Homeक्राईम स्टोरीThane Crime | व्हिडिओ रेकॉर्ड करुन महिलेने केली आत्महत्या, परिसरात प्रचंड खळबळ

Thane Crime | व्हिडिओ रेकॉर्ड करुन महिलेने केली आत्महत्या, परिसरात प्रचंड खळबळ

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याची (Committed suicide) घटना ठाण्यात (Thane Crime) घडली आहे. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ रेकॉर्ड (Video record) करुन हा व्हिडिओ मैत्रिणींना पाठवल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.27) पहाटेच्या सुमारास ठाण्यातील (Thane Crime) वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या (Vartaknagar Police Station) हद्दीत घडली आहे.

प्रिती शिवकुमार जैयस्वाल Preeti Jaiswal (वय-35) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी पिडित महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती देणारा व्हिडिओ रेकॉर्ड करुन मैत्रिणींना पाठविला. व्हिडिओ रेकॉर्ड करुन विवाहित महिलेने आत्महत्या केली हे समजताच परिसरात खळबळ उडाली आहे.

विवाहितेने मैत्रिणींना पाठवलेल्या व्हिडिओत पतीने तिच्या आजाराकडेही कसे दुर्लक्ष केले,
याचाही उल्लेख तिने केला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चौकशी करून यामध्ये असलेल्या दोषी विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले आहे.

मयत प्रितीने व्हिडिओत म्हटले आहे की, तिच्या आजाराकडे दुर्लक्ष करताना डॉक्टरांकडे न नेता तिचा पती मेलीस तरी चालेल, असे निर्दयीपणे म्हटल्याचेही तिने म्हटले आहे.
तसेच सासरचे आपल्याला खर्चासाठी एक छदामही देत नाहीत.
त्यामुळे आपण पैसे जोडून शिलाई मशीन घेतली. तर तिचा वापर करण्यात मनाई केली.
आपण उचलत असेलल्या या टोकाच्या पवालाबद्दल स्वत:च्या आई वडिलांची माफीही या संदेशात तिने मागितली आहे.

Web Title : Thane Crime | Woman commits suicide by recording video, huge commotion in the area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News