ठाणे : पत्र्याच्या पेटीत पुरुषाचा मृतदेह आढळला; प्रचंड खळबळ

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका लाल रंगाच्या पत्र्याच्या पेटीत 35 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळल्याने ठाण्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी (दि. 13) सांयकाळी पावणे सातच्या सुमारास ठाण्यातील दिवा खाडी जवळ ही घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा-शिळफाटा मार्गावरील खर्डी गाव येथे एक लोखंडी पेटी आढळली आहे. या पेटीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पेटी उघडली असता सर्वांनाच एक मोठा धक्का बसला. पत्र्याच्या पेटीत चक्क एका अंदाजे 35 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. लाल रंगाची ही पत्र्याची पेटी इथे कोणी आणून टाकली, तसेच हा मृतदेह नेमका कुणाचा आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.