Thane-Diva corridor | 5 व्या आणि 6 व्या मार्गाच्या कामासाठी ठाणे- दिवा धिम्या कॉरिडॉरवर 18 तासांचा ‘मेगाब्लॉक’; जाणून घ्या रद्द झालेल्या एक्सप्रेस ट्रेनची यादी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Thane-Diva corridor | दि. १९.१२.२०२१ रोजी ठाणे- दिवा ५व्या आणि ६व्या मार्गिका आणि दिवा (उत्तर) येथे क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे ठाणे आणि दिवा दरम्यान विशेष पायाभूत सुविधा ब्लॉक परीचालीत करणार आहे. हा ब्लॉक दि. १९.१२.२०२१ (रविवार) च्या ०८.०० वाजल्यापासून दि. २०.१२.२०२१ (सोमवार) च्या ०२.०० वाजेपर्यंत चालवला जाईल. दि. १९.१२.२०२१ (रविवार) च्या ०८.०० वाजल्यापासून दि. २०.१२.२०२१ (सोमवार) च्या ०२.०० वाजेपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गांवर ब्लॉक परीचालीत केला जाईल. यामुळे ट्रेन चालण्याची पद्धत खालीलप्रमाणे असेल (Thane-Diva corridor) –

 

उपनगरीय सेवा:
दि. १९.१२.२०२१ रोजी कल्याण येथून ०७.४७ ते २३.५२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या अप धीम्या/अर्ध जलद सेवा दिवा आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील व या सेवा मुंब्रा आणि कळवा येथे थांबणार नाहीत. पुढे मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

 

दि. १९.१२.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या व मुलुंड येथून ०७.४२ ते ०१.१५ वाजेपर्यंत (२०.१२.२०२१ रोजी) सुटणाऱ्या डाउन धिम्या/अर्ध-जलद सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व कळवा आणि मुंब्रा येथे थांबणार नाहीत, पुढे दिवा स्थानकावर डाउन धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

ब्लॉक कालावधीत कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. (Thane-Diva corridor)

कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून चढणाऱ्या प्रवाशांना अनुक्रमे डोंबिवली आणि कल्याण येथून गाड्यांमध्ये चढण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाच्या समन्वयाने बसेस चालवण्याची सूचना केलेली आहे. (Thane-Diva corridor)

 

दि. १८.१२.२०२१ (शनिवार) रोजी सुरु होणारा एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास रद्द

12112 अमरावती- मुंबई एक्सप्रेस

17611 नांदेड- मुंबई एक्सप्रेस

11030 कोल्हापूर- मुंबई कोयना एक्सप्रेस

दि. १९.१२.२०२१ (रविवार) रोजी सुरु होणारा एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास रद्द

11007 / 11008 मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस,

12109 /12110 मुंबई – मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस,

12071 /12072 मुंबई – जालना- मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस,

11401 मुंबई -आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस,

12123 /12124 मुंबई -पुणे – मुंबई डेक्कन क्वीन,

12111 मुंबई -अमरावती एक्सप्रेस,

11139 मुंबई- गदग एक्सप्रेस,

17612 मुंबई-नांदेड एक्सप्रेस,

11029 मुंबई- कोल्हापूर कोयना एक्सप्रेस

दि. २०.१२.२०२१ (रविवार) रोजी सुरु होणारा एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास रद्द

11402 आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस

11140 गदग -मुंबई एक्सप्रेस

एक्सप्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन

17317 हुबळी -दादर एक्सप्रेस दि. १८.१२.२०२१ रोजी सुटणारी पुणे येथे शॉर्ट टर्मिनेशन होईल आणि

17318 दादर-हुबळी एक्सप्रेस दि. १९.१२.२०२१ रोजी सुटणारी ट्रेन पुण्याहून शॉर्ट ओरिजिनेट होऊन निघेल.

या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

Web Title :- Thane-Diva Corridor | Check List of trains cancelled due to block on Thane-Diva corridor Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Vicky Kaushal Airport Viral Video | विमानतळावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार येताच कैतरिनाच्या पतीनं केलं असं काही.. पाहा व्हायरल व्हिडिओ

Amit Shah | ‘मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतील, पण…’ – अमित शाह (व्हिडिओ)

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 52 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी