मुंब्र्यात 2 मजली इमारतीमध्ये अग्नितांडव, सुदैवाने जीवितहानी नाही

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्य कोरोनाच्या व्हायरसचा सामना करीत असताना मुंब्र्यातील दोन मजली इमारतीमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले होते. काही क्षणात ही आग भडकली आणि रौद्र रुप धारण केले होते. 5 टेक्साटाइल डायनिंग युनिटमध्ये ही आग लागली होती. स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला फोन करून आगीची माहिती दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

पहाटे 3 च्या सुमारास लागलेल्या टेक्साटाइल डायनिंग युनिटमधील आगीच कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. त्यानंतर घटनास्थळी कुलिंग करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली असावी याची चौकशी करण्यात येणार आहे. या आगीमुळे युनिटमधील लाखों रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.