Thane-Kalyan Crime News | कल्याणजवळ गजा मारणे रॅली प्रकरणाची पुनरावृत्ती, जाणून घ्या प्रकरण

कल्याण (Kalyan) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Titwala Police Thane । महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्या (मोक्का) Mocca अंतर्गत कारवाई झालेल्या आणि जामिनावर सुटलेल्या आरोपीची जंगी मिरवणूक (Procession) काढल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कल्याण जवळच्या बोरगावात घडला आहे. या प्रकारावरून टिटवाळा पोलीस ठाण्यात (Titwala Police Thane) आरोपीविरुद्ध आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जंगी मिरवणुकीचा (Procession) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

काही दिवसापूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन मारणे (Gajanan marane) याची जामीनीवर सुटका झाल्यावर फटक्याच्या जल्लोषात मुंबई हायवेवरून मिरवणूक (Procession) काढण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणावरून जवळजवळ शंभर जणांवर गुन्हे दाखल केले होते. अशा पद्धतीचा प्रकार हा कल्याण येथील बोरगावात घडला आहे. या प्रकरणाची मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) गंभीर दखल घेतली होती. तर गुन्ह्यात शिक्षा भोगून जेलमधून बाहेर आलेल्या आरोपीची जल्लोषात मिरवणूक (Procession) काढण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. याप्रकारे नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Procession of Mocca accused released on bail)

आता घडलेल्या प्रकाराबाबत अधिक माहिती अशी की, टिटवाळा पोलीस ठाण्याच्या (Titwala Police Thane) हद्दीतील वरप बोरगावातील गणेश म्हसकर (Ganesh Mhaskar),
महेश पाल (Mahesh Pal) हे दोघे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्या (मोक्का) Moccaअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
तर यामधील महेश पाल (Mahesh Pal) याची काही महिन्यांपूर्वी जामिनावर सुटका झाली होती. तर दुसरा म्हणजे गणेश म्हसकरची (Ganesh Mhaskar) गुरुवारी (1 जुलै) रोजी जामिनावर सुटका झाली. यावरून या दोघांच्या समर्थकांकडून त्या दोघांची गावामधून जंगी मिरवणूक (Procession)
काढण्यात आली. तर मिरवणुकीचा (Procession) हा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला. यावरून टिटवाळा पोलिसांनी (Titwala Police Thane) कडक पावले उचलत दोन्ही आरोपींसह अन्य काही त्यांच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाच्या परिस्थिती मिरवणूक काढल्याबाबत देखील त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Thane-Kalyan Crime News | thane kalyan two booked for taking out procession after releasing from jail like gangstar gajanan marne of pune

हे देखील वाचा

7th Pay Commission । केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी ! बँक अकाऊंटमध्ये जमा होणार 2,18,000 रूपये; जाणून घ्या कसे

New Liquor Licence | मुंबईसह राज्याच्या मद्य नियमावलीत सुधारणा होण्याची शक्यता

Builder Avinash Bhosale | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या मुलाची ईडीकडून चौकशी

Modi Government । नोकरदारांसाठी खुशखबर ! आता सुट्ट्या वाढणार तर PF, पगारात होणार मोठा बदल; लवकरच मोदी सरकार निर्णय घेणार