ठाणे : दाऊदच्या हस्ताकाकडून मोठा शस्त्रसाठा जप्त

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आराेपींकडे चौकशी दरम्यान ठाणे खंडणी विरोधी पथकाने दाऊतच्या हस्तकाकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी गोरेगांव येथील दाऊच्या हस्तकाच्या घरावर छापा टाकून  एके ५६ रायफल, मॅगझीन, ९५ काडतुसे, दोन ९mm पिस्टल व १३ काडतुसे जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी (दि.६) गोरेगांव येथील क्रांती चाळ भगतसिंगनगर येथे करण्यात आली.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e3e2d82a-81dd-11e8-86ce-c13b5ac97990′]

गुरुवारी (दि.५) ठाणे येथे नामचिन ड्रग्ज सप्लायर ड्रगची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून जाहिद अली शौकत काश्मीरी (वय-४७ रा. काश्मीरी अपार्टमेंट, नागपाडा, मुंबई) आणि संजय बिपीन श्रॉफ (वय-४७ रा. आर.एस. निमकर मार्ग, नागपाडा, मुंबई) यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेण्यात आली. अंगझडतीमध्ये दोघांकडे ५ ग्रॅम वजनाचे कोकीन सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून कोकीन, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १ लाख ५७ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना बुधवार (दि.११) पर्य़ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीत असताना जाहिद काश्मीरी याच्याकडे चौकशी केली असता, दाऊद गँगचा सदस्य नईम फईम खान याच्या घरामध्ये मोठा शस्त्र साठा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बांगुर नगर येथील नईम खान याच्या घरावर छापा टाकून एके ५६ रायफल, मॅगझीन, ९५ काडतुसे, दोन ९mm पिस्टल व १३ काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला. पोलिसांनी नईम खानची पत्नी यास्मीन नईम खान (वय-३५) हीला शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea67b303-81dd-11e8-9139-f5b0ef367fe6′]

यास्मीन खानचा पती नईम खान याला एप्रिल २०१६ मध्ये खूनाच्या गुन्ह्यात मुंबई गुन्हे शाखेने यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात चार जणांना अटक करण्यात आली असून, कुख्यात गँगस्टर छोटा शकील याच्या सांगण्यावरुन इक्ब्बाल अत्तरवाला याला ठार मारण्यासाठी आले असताना चौघांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती.

ही कारवाई पोलीस आयुक्त परम बीर सिंग, सहायक पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मकरंद रानडे, पोलीस उपआयुक्त गुन्हे अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलीस आयुक्त शोध-१ गुन्हे एन.टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके, पोलीस उप निरीक्षक विलास कुटे, रमेश कदम, हेमंत ढोले, अविनाश महाजन, पोलीस कर्मचारी पवार, भिवनकर, बुकाणे, चौधरी, मोरे, कटकधोंड, भोसले, तावडे, गोसावी, कदम, मोटे, भांगरे, ठाकरे, महाले, भुर्के, साबळे मुकणे, नरे, ओवळेकर यांच्या पथकाने केली.