Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Thane Measles Update | वेगवेगळ्या साथ रोगांमुळे कायम त्रस्त असणारे मुंबईकर गोवरच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चांगलेच चिंतेत दिसून येत आहेत. गोवरची ही साथ केवळ मुंबई पुरतीच मर्यादित राहिली नसून या साथीने ठाणे जिल्ह्यात सुद्धा हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. गोवरचा प्रादुर्भाव होऊन ठाण्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून झपाट्याने वाढणाऱ्या या संख्येमुळे ठाणेकर सुद्धा चिंताग्रस्त दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गोवरचा वाढता प्रभाव ठाणेकरांसाठी काहीसा आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे मुंबईबरोबरच ठाण्यासुद्धा मुख्यमंत्री शिंदे स्वतः लक्ष घालतील का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. (Thane Measles Update)

 

मुंबईत सध्या गोवरच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे जिल्हा सुद्धा गोवरच्या विळख्यात सापडला आहे. ठाण्यात गोवरमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे. ठाण्यातील प्रामुख्याने मुंब्रा आणि भिवंडी या परिसरात गोवरचा प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्वेक्षण आणि लसीकरणासारखी प्रतिबंधात्मक पावले उचलली जात आहेत परंतु हे उपाय राबवण्यास अडचणीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. (Thane Measles Update)

 

ठाण्याच आतापर्यंत गोवरचा दुसरा बळी गेल्याचे माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली असून भिवंडी परिसरात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यु झाला आहे. त्यानंतर काल मुंब्रा येथे कौसा परिसरात दीड वर्षीय बाळाचा गोवरमुळे मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, गोवरचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाणे महापालिका प्रशासनाकडून ठाण्यातील मुंब्रा कौसा परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्या बाळांचे गोवरचे दोन डोस पुर्ण नाहीत अशांचे पुन्हा लसीकरणा सुरू करण्यात आले आहे.

परंतु, नागरिक या सर्वेक्षणासाठी विरोध दर्शवत असल्याची माहितीच आता समोर येत आहे.
लसीकरण न झाल्यामुळेच ठाण्यातील मुंब्रा परिसरातील बालके दगावत असल्याची धक्कादायक बाब लक्षात आली असून सुद्धा नागरिकांमध्ये तरी याबाबत कमालीची उदासीनता दिसून येत आहे.
केवळ मुंबई, ठाणे नव्हे तर औरंगाबादमधील नेहरुनगर, चिकलठाणा, विजयनगर या तीन वसाहतींमध्ये सुद्धा
गोवर आजाराचा उद्रेक झाला असल्याचे तेथील महापालिकेने गुरुवारी (१ डिसेंबर) जाहीर केले.

 

औरंगाबादमध्ये गुरुवारी सात बालके गोवरबाधित आढळून आली, तर १४ बालके गोवर संशयित म्हणून आढळून आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान गोवर संसर्गाचा फटका बसू नये म्हणून नागपूर शहरातील बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी बुधवारपर्यंत १ लाख ८९ हजार ९४७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले
असून त्यात ५ वर्षाखालील ५२,४०६ बालकांची नोंद करण्यात आली आहे.
शहरात १७ गोवर संशयित बालके आढळली होती.

 

Web Title :- Thane Measles Update | thane measles update five child died due to outbreak in chief minister eknath shinde district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aurangabad Crime | एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीला दिली जिवे मारण्याची धमकी; होणाऱ्या नवऱ्याला दाखविणार होता ‘ते’ फोटो

CM Eknath Shinde | कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद ! अखेर जत तालुक्याला मिळणार न्याय, मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ माेठी घोषणा

Gold Mines In Maharashtra | महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांत सोन्याच्या खाणी? जाणून घ्या ठिकाणं