ठाणे मनपानं लावली फक्त 10 सेकंदात ‘सॅनिटाइज्ड’ करणारी मशिन, ‘अशी’ करते काम

ठाणे : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची प्रकरणे सतत वाढत असून आतापर्यंत एकूण १०७८ प्रकरणे समोर आली आहेत. तर या व्हायरसने ६४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठाणे महानगरपालिका मुख्यालयात ऑटोमॅटिक सॅनिटायझिंग मशीन बसवण्यात आली आहे. या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे एखादी व्यक्ती जर त्यातून गेली तर ती मशीन केवळ दहा सेकंदात सॅनिटाइज करते.

महापालिका मुख्यालयात येणारी प्रत्येक व्यक्ती या मशीनद्वारे प्रवेश करेल. याची सुरूवात प्रायोगिकरित्या झाली आहे. या स्वयंचलित मशीनसाठी ५०० लिटर पाण्याची टाकी बसवण्यात आली असून ०.५ टक्के पॉलिमरिक बेक्युनाइड हायड्रोक्लोराइड वापरण्यात आले आहे. हे मशीन डोक्यापासून पाया पर्यंत सॅनिटाइज करते.

कोरोना व्हायरसच्या लढाईत डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी जीव धोक्यात घालून दिवस-रात्र काम करत आहेत. मुंबईच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालयात कोविड-१९ च्या रूग्णाच्या उपचारादरम्यान १५ नर्सेसला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या चाचणीत या नर्स पॉजिटीव्ह आढळल्या असून या सर्व १५ नर्सेसला आता क्वारंटाइन मध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान मुंबईतील खासगी रुग्णालय जसलोक रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांमधील २१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे रुग्णालयाने तातडीने सर्व सेवा स्थगित केल्या आहेत. पण जसलोक रुग्णालयात आपतकालीन सेवा सुरू राहतील.