फडणवीस Vs ठाकरे ! शिवसेनेनं घेतला आणखी एक मोठा निर्णय

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना विरुद्ध अमृता फडणवीस हा वाद दिवसेंदिवस टोकाला पोहचत चालला आहे. अमृता फडणवीस यांच्या टीकेनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस दलाची अ‍ॅक्सिस बँकेतील सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेने देखील मोठा निर्णय घेतला आहे.

ठाणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे अ‍ॅक्सिस बँकेत खाती आहेत. आता या बँकेतील खाती सरकारी बँकेमध्ये ताबडतोब वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी आज (गुरुवार) तातडीची बैठक घेऊन यासंबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. एलबीटी, टॅक्स खाती, कर्मचाऱ्यांचे पगार खाती सध्या अ‍ॅक्सिस बँकेत आहेत. त्यांना सरकारी बँकेमध्ये वळण्यात येणार आहेत.

काही दिवासांपूर्वी अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर शिवसेनेनं एकापाठोपाठ धक्कातंत्र हाती घेतले आहे. याआधीही ठाकरे सरकारने आणखी एक असाच निर्णय घेतला होता. या निर्णयाचा दणका आता अ‍ॅक्सिस बँकेला बसणार आहे. या बँकेत तब्बल दोन लाख पोलिसांचे सॅलरी अकाऊंट्स आहेत. ती सर्व खाती आता सरकारी मालकीच्या एसबीआयमध्ये वर्ग करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती पुढे येत आहे. याबाबत राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होणार असल्याचे सांगितले जातेय.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/