राष्ट्रवादीमध्ये एन्ट्री करणार्‍या 18 नगरसेवकांबाबत काँग्रेस घेणार ‘हा’ निर्णय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम : पक्षविरोधी कृती आणि काम करणारे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीं विरोधात शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे. भिवंडीतील पक्ष कार्यालयात घेतलेल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत ते बोलत होते.

‘पक्षविरोधी कृती करणाऱ्यांवाविरोधात शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात येईल’
नाना पटोले म्हणाले, पक्ष कार्यालय हे कार्यकर्त्यांचं शक्तिकेंद्र आहे. त्यामुळं पक्ष कार्यालयात समस्या घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचं मत ऐकून त्याचं निवारण करणं गरजेचं आहे. पक्षाची शिस्त पाळणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. यापुढे पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींविरोधात शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

‘सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपले मतभेद विसरून एकत्र येणं गरजेचं आहे’
पुढं बोलताना ते म्हणाले, राज्यात सत्ता असूनही पक्ष कार्यकर्त्यांची काम होत नसल्यानं आता जिल्हा स्तरावर पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी मंत्र्यांचे जनता दरबार आयोजित करण्यात येतील. आगामी निवडणुका या स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीकोनातून चाचपणी सुरू आहे. त्यासाठी राज्यात काँग्रेस पक्ष बळकट करणं गरजेचं आहे. त्यामुळं आता सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपले मतभेद विसरून एकत्र येणं गरजेचं आहे.

‘पक्षविरोधी कारवाई आणि ध्येय धोरणांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई’
नाना पटोले असंही म्हणाले की, यापुढं गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. पक्षविरोधी कारवाई आणि ध्येय धोरणांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं.