ठाणेताज्या बातम्या

Thane News | द्यायची होती कोविड-19 व्हॅक्सीन पण दिली रॅबीजची लस, नर्सला करण्यात आले निलंबित

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Thane News | ठाणे येथे एका व्यक्तीला कोविड-19 च्या ऐवजी चुकून रॅबीजची व्हॅक्सीन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निष्काळजीपणाचा हा प्रकार समोर आल्यानंतर व्हॅक्सीनचा डोस देणार्‍या नर्सला निलंबित करण्यात आले आहे. ही नर्स ठाणे महापालिकेच्या (Thane Corporation) रूग्णालयात काम करते.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, ही घटना सोमवारी कळवा येथील आठकोणेश्वर आरोग्य केंद्रात घडली. राजकुमार यादव नावाचा व्यक्ती कोविशील्ड व्हॅक्सीन घेण्यासाठी आला होता परंतु माहिती नसल्याने तो त्या रांगेत बसला जिथे अठत इंजेक्शन दिले जात होते.

यानंतर डोस देणारी नर्स किर्ती पोपरे यांनी राजकुमार यादव यांचा केस पेपर न पाहता त्यांना रॅबीजची व्हॅक्सीन दिली.
या प्रकरणी ठाणे महापालिकेकडून जारी वक्तव्यात म्हटले आहे की, व्हॅक्सीन देणार्‍याची ही जबाबदारी आहे की,
त्याने लस देण्यापूर्वी प्रत्येकाचा केस पेपर पाहिला पाहिजे.

महापालिकेने म्हटले की, नर्सच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडला आणि एका व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण झाला, हे नाकारता येणार नाही.
यासाठी शिस्तपालन करवाई म्हणून नर्सला निलंबित करण्यात आले आहे. यादरम्यान तिला मुख्यालयात ठेवण्यात येईल.

 

युपीत घडले होते 3 प्रकार

यापूर्वी सुद्धा देशभरात असे प्रकार घडले आहेत.
याच वर्षी एप्रिलमध्ये युपीमध्ये कोविड व्हॅक्सीन घेण्यासाठी आलेल्या तीन ज्येष्ठ महिलांना रॅबीजची व्हॅक्सीन देण्यात आली होती.
एका महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.

मोबाईलवर बोलत नर्सने दिले 2 डोस
धक्कादायक म्हणजे युपीच्या कानपुर जिल्ह्याच्या मंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका नर्सने मोबाइलवर बोलत-बोलत एका महिलेला कोविड-19 चे एकाचवेळी दोन डोस दिले होते. (Thane News)

Web Title :- Thane News | maharashtra thane a man administered rabies vaccine instead of covid 19

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Surgical Strike | ती रात्र…जेव्हा लष्कराने PAK मध्ये 3 किलोमीटर आत घुसून उडवली दहशतवाद्यांची ठिकाणे, 4 तासात केला होता 38 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

Shiv Sena MP Bhavana Gawali | शिवसेना खा. भावना गवळी यांच्या अडचणीत आणखी वाढ, जाणून घ्या प्रकरण

Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

Back to top button