Thane News | ठाणे पोलिसांची कारवाई ! शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळा प्रकरणी तिघांना अटक; मुख्य संशयित घेवारे अद्यापही फरारच

मीरा भाईंदर : पोलीसनामा ऑनलाइन – मीरा भाईंदर शहरात झालेल्या शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळ्याप्रकरणी ULC scam आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. मीरा भाईंदरचे निवृत्त सहाय्यक नगररचनाकार सत्यवान दणेगावे, आरेखक भरत कांबळे, आर्किटेक्ट चंद्रशेखर लिमये अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान यातील मुख्य सूत्रधार असलेला संशयित दिलीप घेवारे अद्यापही फरारच आहे. ठाणे पोलिसांनी (Thane police) Thane News गुरुवारी रात्री उशीरा ही कारवाई केली. दरम्यान या तिघांच्या अटकेमुळे मीरा भाईंदर परिसरात खळबळ उडाली आहे.

नागरी कमाल जमीन धारणा अधिनियम 1976 च्या कलम 20 अंतर्गत जिल्हाधिकार्‍यांनी मंजूर केलेल्या गृहबांधणी प्रकल्पात अपर जिल्हाधिकार्‍यांच्या ना हरकत दाखल्यानंतरच त्यावर मुदतवाढ देण्याचे स्पष्ट आदेश आहेत.
मात्र हे आदेश धाब्यावर बसवत पालिकेकडून विकासकांना गृहबांधणी प्रकल्पांना मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हा घोटाळा संपूर्ण राज्यात गाजला आहे.
याप्रकरणी 2016 मध्ये चार बिल्डरांविरोधात ठाणे नगर पोलिस (Thane police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्या गुन्ह्यात तपास करून त्याचे आरोपपत्रही न्यायालयात पाठवण्यात आले आहे.

मात्र विकासक राजू शहा यांनी उच्च न्यायालय, High Court गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करून या गुन्ह्याचा पुन्हा तपास करण्याची मागणी केली आहे.
त्यानुसार या गुन्ह्याचा Crime पुन्हा ठाणे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
त्या तपासात या तिघांची नावे उघड झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
शुक्रवारी त्यांनी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याप्रकरणात नगरविकास विभागातील अनेक बड्या अधिकार्‍यांचा समावेश असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. शिवाय अधिकार्‍यांसह अनेक मोठे बिल्डर अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात या गुन्ह्याचा तपास सीआयडी CID किंवा स्पेशल एसआयटीकडे देण्याची मागणी विकासक राजू शहा यांच्यासह मीरा भाईंदर परिसरातून होत आहे.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात

कोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात 3400 मृत्यू

Ajit Pawar | यंदाही पायी वारी अन् विठ्ठल दर्शन नाहीच; देहु-आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी, अजित पवार यांची माहिती