home page top 1

ठाणे येथील धक्‍कादायक प्रकार ! नोकरी टिकवण्यासाठी महिला सुरक्षा रक्षकाकडे ‘सेक्स’ची मागणी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – नोकरी टिकविण्यासाठी महिला सुरक्षा रक्षकाकडे सहकारी सुरक्षारक्षकानेच चक्क शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील टिकुजिनीवाडी या रिसॉर्टमधील हा प्रकार आहे. रणवीरसिंग सणमेदा वय ५४ वर्ष असं शरीरसुखाची मागणी केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मानपाडा येथील टिकुजिनीवाडी येथे ३२ वर्षीय महिला सुरक्षारक्षकाचे काम करते. याच ठिकाणी सणमेदा काम करत होते. २५ जुलैला सायंकाळी सणमेदा यांनी महिलेला स्वच्छतागृहाजवळ बोलवले. तेव्हा तिला सुरक्षारक्षक एजन्सी बदलणार असून तुला नोकरी टिकवायची असेल तर शरीरसंबंध ठेवण्यासाठी सांगण्यात आले. तिने त्यावर स्पष्ट नकार दिला होता. तेव्हा त्याने तिच्यावर जबरदस्ती केली.

हा प्रकार तेथे उपस्थित एका कर्मचाऱ्यानेही पाहिला. त्यानंतर महिलेने सुरक्षारक्षक एजन्सीचे कार्यकारी अधिकारी सुयोग्य बारवकर यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर चितळसर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी माहिती घेत पोलिसांनी याबाबत वेळीच हस्तक्षेप करून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली. तसंच व्यवस्थापनाने याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, टिकुजिनीवाडी पर्यटनस्थळ नावाजले असून तेथे मागील काही वर्षांपासून बेशिस्त कारभार सुरु आहे. तेथील महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तवणूक होत आहे. तसंच पर्यटकांसोबतही गैरवर्तवणूक होत आहे, मात्र व्यवस्थापनाकडून कोणतीही कारवाई नाही केली जात, असंही त्यांनी याबाबत म्हटलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like