Thane Shivsena | शिवसेना शाखा कोणाची? पोलिसांच्या ‘फॉर्म्युल्या’मुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद मिटला

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – दसरा मेळाव्यानंतर शिवसेना (Thane Shivsena) आणि शिंदे गटातील (Shinde Group) संघर्ष वाढताना पहायला मिळत आहे. या दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क (Shivaji Park) आणि बीकेसी मैदानावर (BKC Ground) दसरा मेळावा (Dasara Melava 2022) घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यानंतर आता स्थानिक पातळीवर या संघर्षाचे पडसाद उटताना पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाणे परिसरातील कोपरीमध्ये शिवसैनिक (Thane Shivsena) आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या दोन्ही गटातील वाद मिटवला.

 

कोपरीतील (Kopri) कुंभारवाडा परिसरात (Kumbharwada) असलेल्या शिवसेना शाखेवरुन (Thane Shivsena) दोन्ही गटाचे कर्यकर्ते आमने सामने आले होते. या भागातील शिवसैनिक आज कुंभारवाडी येथील शाखेचा (Shivsena Branch) ताबा घेण्यासाठी आले. त्यावेळी तेथील शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याला जोरदार विरोध केला. यातून शिवसैनिक आणि शिंदे गटाच्या कर्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काहीवेळ परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. कुंभारवाड्यातील शिवसेना शाखा कोणाच्या मालकीची यावरुन दोन्ही गटात बराचवेळ वाद सुरु राहिला.

शाखेची डागडुजी व देखभाल मागील अनेक वर्षापासून आम्हीच करत असल्याचा दावा शिंदे गटाने करुन शाखा आमची असल्याचे सांगितले.
आम्ही बाहेरच्या लोकांना शाखा ताब्यात घेऊ देणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली.
यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले होते. हा वाद चिघळत असताना अखेर पोलिसांनी मध्यस्थी केली.
पोलिसांनी या शाखेला टाळे लावून याच्या दोन चाव्यापैकी एक चावी शिवसेना आणि दुसरी चावी शिंदे गटाला देण्यात आली.
दोन्ही गटांचे कार्यकर्ते या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत बसतील, असा तोडागा पोलिसांनी काढला अन् दोन्ही गटातील वाद मिटला.

 

Web Title :- Thane Shivsena | shivsena and eknath shinde camp party workers scuffle rada at kopri thane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shanikrupa Heartcare Centre  | संकल्प निरोगी हृदयाचा..!, शनिकृपा हार्टकेअर मधील योग्य तपासणीमुळे जीवन होईल सुरक्षित

Pune Crime | लोनॲप” फसवणूक टोळीला ‘मोक्का’, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे ‘मोक्का’ कारवाईचे ‘शतक’

Shimron Hetmyer | ‘प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजूही असते,’ शिमरॉननं रिपोस्ट केली स्टोरी