Thane ULC Scam | शेकडो कोटींचा युएलसी घोटाळा ! मुख्य संशयित दिलीप घेवारेला अटक; ठाणे गुन्हे शाखेची गुजरातमधील सूरतमध्ये कारवाई

मीरा भाईंदर (Mira-Bhayander) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – ठाण्याच्या मीरा भाईंदर (Mira-Bhayander) शहरात झालेल्या शेकडो कोटींच्या युएलसी घोटाळ्या प्रकरणातील (Thane ULC Scam) मुख्य संशयित नगररचनाकार दिलीप घेवारे (Dilip Gheware, the Town planner of Mira-Bhayander) याला शुक्रवारी सकाळी अटक (Arrest) करण्यात आली. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने (Thane Crime Branch) गुजरातमधील सूरत (Surat) येथे ही कारवाई केली. याप्रकरणी यापूर्वी मीरा भाईंदरचे (Mira-Bhayander) निवृत्त सहाय्यक नगररचनाकार सत्यवान दणेगावे, आरेखक भरत कांबळे, आर्किटेक्ट चंद्रशेखर लिमये अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. घेवारे याच्या अटकेमुळे अनेक बड्या अधिकार्‍यांची नावे तपासात समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ULC scam worth hundreds of crores! Main suspect Dilip Gheware arrested; Action of Thane Crime Branch in Surat, Gujarat

नागरी कमाल जमीन धारणा अधिनियम 1976 च्या कलम 20 अंतर्गत जिल्हाधिकार्यांनी मंजूर केलेल्या गृहबांधणी प्रकल्पात अपर जिल्हाधिकार्यांच्या ना हरकत दाखल्यानंतरच त्यावर मुदतवाढ देण्याचे स्पष्ट आदेश होते. मात्र हे आदेश धाब्यावर बसवत पालिकेकडून विकासकांना गृहबांधणी प्रकल्पांना मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये शेकडो कोटींचा घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा घोटाळा संपूर्ण राज्यात गाजला आहे. याप्रकरणी 2016 मध्ये चार बिल्डरांविरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या गुन्ह्यात तपास करून त्याचे आरोपपत्रही न्यायालयात पाठवण्यात आले आहे.

मात्र, विकासक राजू शहा यांनी उच्च न्यायालय, गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करून या गुन्ह्याचा पुन्हा
तपास करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार या गुन्ह्याचा पुन्हा ठाणे पोलिसांकडून तपास
करण्यात येत आहे. त्या तपासात या तिघांची नावे उघड झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू झाल्यानंतर मुख्य संशयित घेवारे पसार झाला होता. त्याने अटकपूर्व
जामिनासाठी न्यायालयात अर्जही केला होता. त्यावर आज शुक्रवारी सुनावणी होणार होती. मात्र
सुनावणी होण्यापूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषणच्या शाखेने सूरत येथे सापळा रचून त्याला अटक केली.
ठाणे गुन्हे अन्वेषणचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सरदार पाटील, निरीक्षक मनोहर पाटील, अनिल होनराव, अशोक होनमाने, साय्यक निरीक्षक महेंद्र जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Titel : Thane ULC Scam | ULC scam worth hundreds of crores! Main suspect Dilip Gheware arrested; Action of Thane Crime Branch in Surat, Gujarat