ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प 

नवी मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – ठाणे-वाशी रेल्वेमार्गावर सानपाडा रेल्वेस्टेशन लगत रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे सकाळी साडेआठ वाजल्यापासून ट्रान्सहार्बर लाईन्स ठप्प झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाण्याकडून वाशीला जाणाऱ्या लोकल जागेवरच उभ्या राहिल्या आहेत. तसेच वाशीहून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलही ठप्प झाल्या आहे.

यामुळे वाशी ते ठाणे दरम्यानच्या सर्व रेल्वेस्थानकावर लोकांची मोठी गर्दी झाली असून पुन्हा लोकल सेवा कधी सुरु होईल, याची प्रवासी वाट पहात आहेत. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरच लोकल सेवा पुन्हा पूर्ववत होईल, असे रेल्वेच्या वतीने सांगण्यात येत आहे.

Loading...
You might also like