ट्विटरवर सुरु झाला thank u dhoni चा ‘ट्रेंड’,चाहत्यांनी शेअर केले आठवणीतले ‘ट्विट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विश्वकपानंतर एकही क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. त्यामुळे अशात वारंवार धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा समोर आल्या होत्या. याआधी देखील धोनीने कसोटीमधून निवृत्ती घेतल्याचा निर्णय अचानकपणे जाहीर केला होता. त्यामुळे आता बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिलेला धोनी पुन्हा येणार की निवृत्ती जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. धोनीबाबत सोशल मीडियावर काल प्रचंड सहानभूती पहायला मिळाली.

बीसीसीआयने जसे महेंद्र सिंह धोनीला करारातील क्रमवारीतून बाहेर केले त्यानंतर लगेच सोशल मीडियावर ‘थँक्यू धोनी’ जोरदार ट्रेंडमध्ये आले. क्रिकेटमधील धोनीच्या चाहत्यांनी अचानक पणे यावेळी धोनी बाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक ट्विट शेअर केले. यावेळी धोनी बाबतचे अनेक जुने व्हिडीओ,मिम्स,फोटोज चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याचे पहायला मिळाले.

एक नजर टाकुयात काय म्हणताहेत चाहते आपल्या ट्विटमधून

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like