Thappad Box Office : चांगल्या सिनेमाची ‘मंद’ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तापसी पन्नूच्या थप्पड सिनेमाची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. क्रिटकली सिनेमाची स्तुती देखील होत आहे. ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शनच्या मते. सिनेमाच्या पहिल्या दिवशी 3.07 कोटी कमावले आहेत. सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता वीकेंडला हा सिनेमा चांगली कमाई करू शकतो. सिनेमाला वर्ड ऑफ माऊथचा फायदा मिळू शकतो.

तरण आदर्शनं एका शब्दात सिनेमा पावरफुल असल्याचं म्हटलं आहे. तरणनं या सिनेमाला 4 स्टार दिले आहेत. सिनेमाबद्दल लिहिताना तरण म्हणतो, “अनुभव सिन्हानं पुन्हा एकदा खूप स्ट्राँग मेसेज दिला आहे. थप्पड तुम्हाला एक त्रासदायक प्रश्न विचारतो. अनुभवचं हे आतापर्यंतचं खूप शानदार काम आहे. तापसीनंही कमाल केली आहे. तिचं मौनंही खूप काही सांगतं.

काय आहे स्टोरी ?
तापसी आपल्या पतीसोबत खूप खुश आहे. परंतु अचानक असं काही होतं की, पती पावेल गुलाटी तिला एक चापट मारतो. यानंतर ती थेट घटस्फोटासाठी अर्ज करते. ट्रेलरमध्येदेखील घरगुती हिंसेबद्दल बोललं गेल्याचं दिसत आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, तापसी त्या महिलांपैकी नाही जी एक चापट विसरून जाईल, तिचा स्वाभिमान विसरून जाईल. यातील एक डायलॉग सर्वांचं लक्ष वेधून घेतो जेव्हा तापसी म्हणते, “त्यानं मला मारलं. पहिल्यांदा मारलं. नाही मारू शकत. बस एवढीशी गोष्ट आहे.” पुढे किती आकांड तांडव होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल.

You might also like