Thappad : ‘शुटींग संपल्यानंतर नॉर्मल व्हायला बराच वेळ लागला’, तापसी पन्नूचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार तापसी पन्नू एक टॅलेंटेड अ‍ॅक्ट्रेस आहे. सध्या आपल्या थप्पड या आगामी सिनेमामुळे ती चर्चेत आहे. नेहमीप्रमाणं तापसीनं आपल्या सिनेमातून सामाजिक संदेश दिला आहे. सध्या तापसी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तापसीनं शुटींगदरम्यान तिला आलेले काही अनुभव सांगितले आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तापसी म्हणाली, “मी साकारलेली भूमिका आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांमध्ये सर्वात चॅलेंजिंग भूमिका होती. जर कोणी असा अत्याचार करत असेल तर त्याला प्रत्युत्तर द्यायला हव असा माझा स्वभाव आहे. परंतु सिनेमात मात्र माझा रोल एकदम विरुद्ध होता. शुटींगनंतरही मला यातून बाहेर यायला खूप वेळ लागला.” तिला या भूमिकेसाठी खूपच मेहनत घ्यावी लागली असंही तिनं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचे दोन ट्रेलर रिलीज करण्यात आले होते. यानंतर सिनेमानं चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

डायरेक्टर अनुभव सिन्हा यांनी डायरेक्ट केलेला हा 11वा सिनेमा आहे. अनुभव आणि तापसी यांनी 2018 मध्ये आलेल्या मुल्क सिनेमात एकत्र काम केलं होतं. यानंतर त्यांचा हा सोबत काम करण्याचा दुसरा सिनेमा आहे. थप्पड सिनेमा 28 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

You might also like