अभिनेत्री तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ चा ट्रेलर रिलीज ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार तापसी पन्नूच्या थप्पड सिनेमाचं पोस्टर कालच (गुरुवार दि. 30 जानेवारी) रिलीज झाला होता. यानंतर आता थप्पडचा ट्रेलर समोर आला आहे. एक महिला आपल्या स्वाभिमानासाठी काहीही करू शकते असंच काहीसं यात दिसत आहे. सध्या ट्रेलरची खूप चर्चा सुरू आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये ?
ट्रेलरमध्ये दिसत आहे की, तापसी आपल्या पतीसोबत खूप खुश आहे. परंतु अचानक असं काही होतं की, पती तिला एक चापट मारतो. यानंतर ती थेट घटस्फोटासाठी अर्ज करते. ट्रेलरमध्ये घरगुती हिंसेबद्दलही बोललं गेलं आहे. ट्रेलरमध्ये दिसत आहे की, तापसी त्या महिलांपैकी नाही जी एक चापट विसरून जाईल, तिचा स्वाभिमान विसरून जाईल. यातील एक डायलॉग सर्वांचं लक्ष वेधून घेतो जेव्हा तापसी म्हणते, “त्यानं मला मारलं. पहिल्यांदा मारलं. नाही मारू शकत. बस एवढीशी गोष्ट आहे.” याशिवाय इतरही दमदार डायलॉग आहेत जे ट्रेलरमध्ये दिसत आहेत.

डायरेक्टर अनुभव सिन्हा यांनी डायरेक्ट केलेला हा 11 वा सिनेमा आहे. अनुभव आणि तापसी यांनी 2018 मध्ये आलेल्या मुल्क सिनेमात एकत्र काम केलं होतं. यानंतर त्यांचा हा सोबत काम करण्याचा दुसरा सिनेमा आहे. थप्पड सिनेमा 28 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.