आठवड्यातून एकदा पाकिस्तानला जाणारी ‘थार लिंक एक्सप्रेस’ भारताकडून रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकस्ताननं तात्काळ भारताशी व्यापारी संबंध तोडले, समझोता एक्सप्रेस बंद केली. आता भारताने देखील जोधपूर ते मुनाबाव या दरम्यान आठवड्यातून एकदा पाकिस्तानला जाणारी थार लिंक एक्सप्रेस रद्द केली आहे.

थार लिंक एक्सप्रेस ही भारत-पाकिस्तान या दोन देशात १८ फेब्रुवारी २००६ पासून सुरू होती. जोधपूरच्या भगतच्या कोठीहून कराची दरम्यान सुरू असलेली ही रेल्वे सेवा रेल्वे मंत्रालयाने रद्द केल्याची घोषणा आज केली आहे. थार लिंक एक्सप्रेसला जोधपूर ते कराची शहराला जोडणारी रेल्वे म्हणून पाहिले जात होते. थार लिंक एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या बाबतची माहिती उत्तर पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली असून पुढील आदेश येईपर्यंत ही रेल्वे सुरू करण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –