विजय मल्ल्याबाबत सुप्रिम कोर्टाच्या या वकिलांने दिला होता सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

विजय मल्ल्या पळून जाण्याच्या चार दिवस आधीच सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी सीबीआयला सावध केले होते. बँकेने विजय मल्ल्याच्या विरोधात कोर्टात दाद मागावी असा सल्ला दवे यांनी बँकेला दिला असल्याची माहिती आता समोर आली आहे. तसेच स्टेट बँक आॅफ इंडियाने विजय माल्ल्याला थांबवण्याबाबतचा कोणताही कायदेशीर सल्ला घेतला नाही असेही दवे यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B077TVWFLB,B01LY2TN7G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c3eb544d-b7ea-11e8-9f46-35fbc68b4e63′]

सुप्रीम कोर्टाचे वकील दुष्यंत दवे यांनी  विजय मल्ल्या भारतातून पळून जाऊ शकतो याची कल्पना एसबीआयचे संचालक आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी यांना दिली होती. मात्र त्यांनी माझा सल्ला ऐकला नाही. त्यामुळे विजय मल्ल्या देश सोडून जाऊ शकला. तसेच त्यांनी मल्ल्याविरोधात कोणतीही कारवाई न केल्यामुळे चार दिवसानंतर तो देश सोडून गेला.

सीबीआयचे कायदेविषयक सल्लागार आणि बँकेचे अधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती दवे यांनी दिली. विजय मल्ल्याविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही बैठक रविवारी पार पडली त्यानंतर सोमवारी मी त्यांची सुप्रीम कोर्टात वाट बघत होतो मात्र कोणीही आले नसल्याचे दवे यांनी सांगितलं. त्यानंतर विजय मल्ल्या ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून पळाला.

विजय मल्ल्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यावर एसबीआयने त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एसबीआयच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी दुष्यंत दवे जे काही सांगत आहेत ते त्यांना सांगू दे आता मी एसबीआयची कर्मचारी नाही. तुम्ही याबाबत सध्याच्या संचालकांना किंवा अध्यक्षांना भेटू शकता असे उत्तर दिले.

विजय मल्ल्यापाठोपाठ अरुण जेटलीवर ललित मोदींचा ट्विटर बॉम्ब

मुंबई : कर्जबुडव्या विजय मल्ल्यानंतर भारतातून फरार झालेल्या आणखी एका आरोपीने अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबाबत ट्वीट केले आहे. मल्ल्याचा दावा खरा असल्याचा सांगत आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी जेटलींची तुलना सापाशी केली आहे. अरुण जेटली यांना खोटे बोलण्याची सवय आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. विजय मल्ल्या आणि अरुण जेटली यांच्या कथित भेटीवर ललित मोदी म्हणाले की, तिथे असलेले लोकांना माहित आहे की, जेटलींनी मल्ल्याची भेट घेतली होती, तर ते हे वृत्त का फेटाळत आहेत? अरुण जेटली यांना खोटे बोलण्याची सवय आहे. तुम्ही एका सापाकडून (सापाचे चिन्ह) आणखी काय अपेक्षा ठेवू शकता. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये अरुण जेटली आणि विजय मल्ल््या यांनाही टॅग केले आहे.

शिक्षक पुरस्कार : आदिवासी भागात काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय