‘महाभारत’मधील ‘ते’ पात्र जे टीव्हीवर कधी आलंच नाही, फक्त एवढंच म्हणालं- ‘मै समय हूं’ !

पोलिसनामा ऑनलाइन –लॉकडाऊनच्या सध्याच्या काळात रामायण आणि महाभारताबद्दल बरीच चर्चा होताना दिसत आहे. तुम्हाला माहिती आहे का, महाभारत या मालिकेत असं एक पात्र आहे जे टीव्हीवर कधी दिसलं नाही. परंतु त्याचा आवाज मात्र आपण ऐकला आहे. या पात्रानं आपल्या आवाजाच्या दमावरच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

बीआर चोपडा यांच्या या महाभारत या मालिकेत समय म्हणून एक पात्र होतं. याचा फक्त आवाज येत असे. हा आवाज होता हरीश भिमानी यांचा. त्यांचा आवाज हा समयचा आवज कसा बनला हे आपण जाणून घेऊयात.

एका मुलाखतीत बोलतान हरिश यांनी सांगितलं, “एकदा सायंकाळी मला गुफी पेंटल (शोचे कास्टींग डायरेक्टर) यांचा फोन आला. ते म्हणाले, बीआरच्या मेन स्टुडिओत येत काही रेकॉर्ड करायचं आहे. मी विचारणा केल्यानंतर त्यांनी काहीच सांगितलं नाही.”

पुढे हरिश म्हणाले, “मी तिथे गेल्यावर माझ्या हातात एक कागद देण्यात आला. मी तो कागद घेतला आणि वाचलं. मी पूर्ण करण्याआधीच मला सांगितलं की, हे डॉक्यमेंट्रीसारखं वाटत आहे. मग मी ते पुन्हा वाचलं. मी विचारलं सुद्धा की, हे काय आहे नेमकं. त्यांनी सांगितलं की, ठिक आहे बघू नंतर. मला वाटलं त्यांना आवडलं नसेल. मग दोन तीन दिवसांनी पुन्हा कॉल आला मी पुन्हा गेलो. मी 6-7 टेक्स्ट दिले.”

हरिश सांगतात, “यानंतर मला त्यांनी सांगितलं की, कसा समयला आवाज द्यायचा आहे. नंतर मी सुचवलं की, माझ्या आवाजाचा टेम्पो बदलावा. नंतर मी आकाशवाणीच्या मधलं काहीतरी केलं. नंतर मी तसंच बोललो की, मै समय हूं. मग काय नंतर ते फायनल झालं.