IPL च्या कामगिरीवर मला टीम इंडियात जागा मिळालेली नाही : जसप्रीत बुमराह

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्यामुळे खेळाडू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. तर काही खेळाडू सोशल मीडियावर एकमेकांशी लाईव्ह चॅट करत अनुभव शेअर करत आहेत. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने नुकत्याच युवराज सिंहसोबत इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर माझ्या आयपीएलमधील कामगिरीमुळे मला भारतीय संघात जागा मिळाली हा गैरसमज असल्याचे सांगितले आहे.

बुमराहने आपल्याला भारतीय संघात मिळालेल्या संधीबद्दल भाष्य केले आहे. 2013 साली मी पहिल्यांदा आयपीएल खेळायला सुरुवात केली. 2013 ते 2015 या काळात माझ्या कामगिरीत सातत्य नव्हते. मात्रा, त्यानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये विजय हजारे चषकात मी चांगली कामगिरी केली, त्यानंतर 2016 साली माझी भारतीय संघात निवड झाली. युवराजसोबत गप्पा मारत असताना बुमराहने स्पष्टीकरण दिले आहे.

कोरोना विषाणूचा फटका सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धांना बसला आहे. बीसीसीआयनेही आयपीएलचा 13 वा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. काही आजी-माजी खेळाडूंनी आयपीएलचा हंगाम प्रेक्षकांविना खेळवण्याची तयारी दाखवली होती. मात्रा, काही दिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी येत्या काळात भारतामध्ये क्रिकेट खेळवणे शक्य नसल्याचे सांगितले होते.