‘दृश्यम’ फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्याबाबतची ‘ती’ बातमी चुकीची : रितेश देशमुख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘डोंबिवली फास्ट’, ‘लय भारी’ आणि ‘दृष्यम’ यासारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शनक निशिकांत कामत यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख यांनी कामत यांच्या निधनाचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले आहे. निशिकांत कामत हे जिवंत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते सध्या व्हेंटिलेटरवर असून ते लवकर बरे व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करुयात, असे ट्विट रितेश देशमुख यांनी केले आहे.

निशिकांत कामत यांना Liver Cirrhosis चा त्रास होता. त्यामुळे त्यांना 11 ऑगस्ट रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाल्याचे ट्विट अभिनेत्री रुचा लखेरा हिने केले होते. यानंतर रितेश देशमुख यांनी कामत यांचे निधन झाले नसून ते जिवंत असल्याचे ट्विट केले आहे. निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर आहेत. ते अजूनही जिवंत आहेत आणि लढा देत आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करुयात असे रितेशने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

निशिकांत कामत यांनी मराठी चित्रपट डोंबिवली फास्टपासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. डोंबिवली फास्ट हा चित्रपट प्रेक्षकांनी खूप पसंत केला. त्यानंतर 2008 मध्ये मुंबई मेरी जान या चित्रपटातही त्यांच काम पहायला मिळालं. हिंदी चित्रपटसृष्टीत दृश्यम हा चित्रपट आयुष्यातील महत्त्वाचा पैलू ठरला या चित्रपटामुळे त्यांचे खूप कौतुक झाले. अजय देवगण, तब्बू यां सारख्या मोठ्या कलाकारांसह केलेल्या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले.

https://twitter.com/zmilap/status/1295250907127377920

कामत हे बॉलिवूडमधील नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक होते. यात अजय देवगणचा दृश्यम, इरफान खानचा मदारी, जॉन अब्राहमचा फोर्स, आणि रॉकी हँडसम या सिनेमांचा समावेश आहे. बॉलिवूडआधी त्याने अनेक मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. तसेच कामही केलं होतं. चित्रपटात ते नकारात्मक भूमिका केल्या आहेत . भावेश जोशी सिनेमात त्याने काम केलं. होतं.