‘त्या’ एका रात्रीनं बदललं आयुष्य, ती रात्र कधीच विसरू शकणार नाही’ : मलायका

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आणि अरबाज खान बॉलिवूडमधील असं कपल होतं जे वेगळं होतील असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं. दोघंही आता आपापल्या आयुष्यात खूप पुढे गेले आहेत. मलायका अर्जुन कपूरसोबत लग्न करण्याचं बोललं जात आहे. तर अरबाज खानही जॉर्जिया एंड्रियानी या मॉडेलला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी मलायकानं करीना कपूरच्या रिडिओवरील मुलाखतीत काही गोष्टींचा खुलासा केला आहे. अरबाजसोबतच्या घटस्फोटाच्या आदल्या रात्री घरात कसं वातावरण होतं याबाबत तिनं सांगितलं होतं.

मलायका म्हणाली, “मी माझ्या निर्णयाबद्दल माझ्या कुटुंबियांना आणि मित्रमैत्रिणींना सर्वात आधी सांगितलं होतं. सर्व मला पुन्हा विचार करण्यास सांगत होते. मी खूप विचार करून निर्णय घेतल्याचं त्यांना सांगत होते. घटस्फोटाच्या रात्री अरबाजचं कुटुंब त्याला पुन्हा एकदा विचार करण्यास सांगत होतं. माझ्या घरीही तशीच स्थिती होती. माझ्या घरातील मंडळी मला वारंवार विचारत होती की, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे का. त्यांच्या बोलण्यातून मला त्यांची चिंता कळत होती. घटस्फोटाच्या आदल्या रात्री सगळेच खूप टेंशनमध्ये होते.”

पुढे बोलताना मलायका म्हणाली, “मी आणि अरबाज घटस्फोट घेत आहोत हे जेव्हा मी घरच्यांना आणि मित्र मैत्रिणींना सांगितलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. काही क्षण ते जागीच स्तब्ध उभे होते. परंतु नंतर मात्र त्यांनी मला पाठिंबा दिला. ते म्हणाले, तू हा निर्णय घेतेस म्हणजे तू कणखर स्त्री आहेस. त्यांच्या अशा बोलण्यानं मला खूप आधार मिळाला. त्या परिस्थितीत मला त्या आधाराची खूपच गरज होती.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like