भल्या पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीवर फडणवीसांचे मोठं विधान, म्हणाले – ‘ती एक चूक होती, पण पश्चाताप होत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप (BJP) अन् शिवसेनेत (Shiv Sena) मुख्यमंत्रीपदावरून फाटल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांशी (Ajit Pawar) हातमिळवणी करून भल्या पहाटे शपथविधी केला होता. पण पाठिंब्यासाठी पुरेस संख्याबळ नसल्याने हे सरकार अवघ्या 80 तासात कोसळलं. पण दीड वर्ष उलटूनही फडणवीस आणि पवार यांच्या 80 तासांच्या सरकारची आजही चर्चा होते. या शपथविधीवर दीड वर्षांनी फडणवीस यांनी मोठ विधान केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत घेतलेली शपथ ही एक चूकच होती, पण त्यांचा पश्चाताप नसल्याचे फडणवीस Devendra Fadnavis यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायला नको होतं. ती आमची चूक होती, असे फडणवीस यांनी मान्य केले आहे. पण ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना आम्हाला उत्तर द्यायचे होते. त्यावेळी मनात खूप राग आणि भावना होत्या. त्यामुळे अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र ते चुकलं. आमच्या काही समर्थकांनाही ते आवडल नाही. या शपथविधीमुळे आमच्या समर्थकांमध्ये जी माझी प्रतिमा होती, त्याला देखील तडा गेला आहे. ते नसत केल तर चांगल झाले असतं असे फडणवीस म्हणाले. दरम्यान 80 दिवसांचे सरकार पडल्यानंतर फडणवीस Devendra Fadnavis यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’